Produced byविश्रांती शिंदे | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम4 Jan 2025, 9:30 pm
बागेश्वर महाराज (धीरेंद्र शास्त्री) भिवंडीतील मानकोली नाका येथे….इंडियन ऑयल कंपनीच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ झालाय. धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या भक्तांना अंगारा देण्याचे सांगितले. त्यांनी आधी महिलांना, त्यानंतर पुरुषांना एका रांगेत येण्याचे आवाहन केले. मात्र, काही वेळातच गर्दीचा ताण वाढत गेला, आणि अंगारा घेण्यासाठी…लोक एकमेकांच्या अंगावरुन पुढे जात असल्याची स्थिती निर्माण झाली.गर्दीचा ताण वाढल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी लोकांना सावरण्याचा प्रयत्न केला. काही महिलांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना बाजूला नेण्यात आले. यानंतर, धीरेंद्र शास्त्री यांनी परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून स्टेज सोडला.