Uddhav Thackeray: जळगावात महावितरणनं पाठवलेल्या वीजेच्या बिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे. वीज बिलांवर ठाकरेंचा फोटो पाहून ग्राहक काहीसे शॉक झाले.
उद्धव ठाकरे यांचा फोटो आणि त्यांचा उल्लेख मुख्यमंत्री असा असलेली बिलं ४ हजार ग्राहकांना गेली आहेत. हा प्रकार समोर येताच एकच खळबळ उडाली. आता या प्रकरणाची चौकशी सुरु असून कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद सोडून अडीच वर्षे उलटली. तरीही कंत्राटदाराला याची कल्पना नाही का, इतकी बिलं छापायला देण्याआधी कोणाचंच लक्ष याकडे गेलं नाही का, असे प्रश्न ग्राहकांना पडले आहेत.
कोटींचा भ्रष्टाचार उघड केला, पत्रकाराची हत्या; बॉडी सेप्टिक टँकमध्ये सापडली, अखेर गूढ उकललं
महावितरणकडून दर महिन्याला वीज बिलाच्या प्रिंटची स्टेशनरी कंत्राटदाराला पुरवण्यात येते. नव्या मुख्यमंत्र्यांचे फोटो असलेली स्टेशनरी महावितरणनं छापलेली असली तरी कंत्राटदारानं शहरात चार हजार बिलं जुन्या कागदांवर छापली. आता याची चौकशी केली जात आहे. कंत्राटदाराला नोटीस पाठवण्यात आलेली आहे.
मराठी पोरं कामाला सूट होत नाहीत! तरुणाला नोकरी नाकारली; ठाकरेंचा शिलेदार अमराठी मालकाला नडला
राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यावर महावितरणनं नव्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह नव्या वीज बिलाचा फॉरमॅट तयार केला होता. महावितरणकडून दर महिन्याला नवा फॉरमॅट कंत्राटदाराला पाठवला जातो. पण तरीही कंत्राटदारानं तब्बल चार हजार बिलं जुन्या कागदांवर छापल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.