Produced byविश्रांती शिंदे | Contributed byडॉ. धनाजी चव्हाण | महाराष्ट्र टाइम्स.कॉम4 Jan 2025, 9:48 pm
संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज परभणीत सर्वपक्षीयांचा मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार गुट्टेंची अनुपस्थिती असल्याने विविध चर्चा रंगल्या होत्या. रत्नाकर गुट्टेंनी माध्यमांशी संवाद साधताना याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, दोन दिवसांपासून माझा नातू बेपत्ता होता, त्यामुळे मला परभणीशहरातील भव्य मोर्चाला उपस्थित राहता आले नाही, गैरसमज नसावा.