Mumbai News: ‘एल अँड टी’ कंपनीने नव्या आराखड्यात दोनऐवजी चार मजली भूमिगत पार्किंगचा समावेश केला असून, हा आराखडा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराकडे सादर करण्यात आला आहे.
मुंबई सागरी किनारा मार्ग प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत बांधण्यात येत आहे. प्रकल्पात हाजी अली येथील रजनी पटेल चौक येथे दुमजली भूमिगत पार्किंग, वरळीजवळ दोन वेगवेगळे भूमिगत पार्किंग आणि अमरसन्स येथे पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. वरळी येथील दोन ठिकाणी पार्किंगचे काम सुरू झाले आहे. हाजीअली येथील पार्किंगच्या कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही. तिथे चारचाकी वाहनांसाठी दुमजली भूमिगत पार्किंगचा आराखडाही तयार करण्यात आला होता. या कामाला २०२२ मध्येच मंजुरी मिळाली होती.
शिंदेंच्या ‘त्या’ निर्णयाला फडणवीसांकडून स्थगिती; आकडेवारी पाहताच चौकशीचे आदेश, प्रकरण काय?
न्यायालयीन प्रकरणामुळे या कामाला विलंब झाला. आता हा प्रश्न सुटल्याने हाजीअली येथील पार्किंग कामाला गती येणे अपेक्षित होते. मात्र, रेसकोर्स येथे सेंट्रल पार्क उभारले जाणार असल्याने येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची, विशेषत: बसची गैरसोय टाळण्यासाठी सागरी किनारा मार्गात हाजीअली येथे रजनी पटेल चौकाजवळ पार्किंगसाठी जागा देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यामुळे त्याच्या आराखड्यात बदल करण्यात आला असून, ‘एल अँड टी’ कंपनीने दुमजली भूमिगत पार्किंगऐवजी चार मजली भूमिगत पार्किंगचा नवा आराखडा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराकडे सादर केला आहे. या पार्किंगमध्ये १ हजार २३५ वाहनांची क्षमता असून, त्यात ७० बसचा समावेश असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी दिली.
पर्यटकांसाठी बस थांबा
हाजी अली येथील रजनी पटेल चौक येथे होणाऱ्या पार्किंगलगत बस थांबाही देण्यात येणार आहे. त्यामुळे हाजी अली दर्गा तसेच रेसकोर्समधील सेंट्रल पार्कमध्ये किंवा सागरी किनारा मार्गालगतचे हरित क्षेत्र पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना बस उभ्या करून तिथे जाता येणे शक्य होणार आहे. त्यानंतर या बस पार्किंगसाठीही रवाना होतील. नवीन आराखड्यात याचाही समावेश करण्यात आला आहे.
Suresh Dhas: कराडनं शरणागतीवेळी वापरलेली ‘ती’ कार…; धसांचा सनसनाटी दावा; आकांनंतर अजित पवारांवर निशाणा
पुढच्या वर्षी सेवेत
मुंबई सागरी किनारा मार्गातील पार्किंगची कामे तीन टप्प्यांत केली जात आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात हाजी अली आणि अमरसन्स येथील पार्किंगचा समावेश आहे. या दोन्हींचा खर्च ३ हजार कोटींपेक्षा जास्त आहे. मात्र, हाजी अली पार्किंगच्या आराखड्यात बदल केल्याने या टप्प्यातील खर्चात वाढ होणार आहे. हाजी अली येथील पार्किंग में २०२५ पर्यंत सेवेत येणार होते. मात्र, बदलेल्या आराखड्यामुळे हे पार्किंग २०२६ मध्ये सेवेत येईल, अमरसन्स येथे २५० वाहनांसाठी पार्किंग उभारले जाणार आहे.