Chhagan Bhujbal: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ उद्याच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची उद्या जयंती आहे. त्या निमित्तानं समता परिषदेनं साताऱ्यात उद्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. नायगावातील या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील उपस्थित राहणार, अशी माहिती आधी देण्यात आलेली होती. पण आता ते या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. ते सोमवारी मुंबईत परतणार आहेत.
Suresh Dhas: कराडनं शरणागतीवेळी वापरलेली ‘ती’ कार…; धसांचा सनसनाटी दावा; आकांनंतर अजित पवारांवर निशाणा
अजित पवार परदेशातून आज रात्री उशिरा मुंबईत येतील. त्यानंतर ते सातारा गाठतील. तिकडे त्यांची भुजबळ आणि फडणवीस यांच्यासोबत चर्चा होईल, अशी माहिती आधी समोर आली होती. पण अजित पवारांचा परदेशातील मुक्काम लांबलेला आहे. त्यामुळे उद्या केवळ भुजबळ आणि फडणवीस यांच्यामध्येच चर्चा होणार आहे. नायगावातील कार्यक्रमादरम्यान दोन्ही नेत्यांची बैठक होईल. मग ते आपली भूमिका ठरवतील.
मंत्रिमंडळात स्थान देण्यात न आल्यानं नाराज झालेल्या भुजबळ यांनी १५ दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यात फडणवीसांनी भुजबळांना यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं. फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळ परदेशी निघून गेले. त्यामुळे गेल्या १० ते १२ दिवसांत त्यांची फडणवीसांशी चर्चा झालेली नाही. आता उद्या हे दोन नेते भेटतील. फडणवीसांशी चर्चा करुन भुजबळ काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Suresh Dhas: धनंजय मुंडे आका असतील तर नाव घ्यायला का घाबरता? संजय सिंघानिया, गझनी; धसांच्या उत्तरानं हशा
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम समता परिषदेनं सुरु केला. त्यामुळे या कार्यक्रमाला खूप महत्त्व आहे. समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळांनी ओबीसी राजकारणात ताकद कमावली. आता हीच ताकद दाखवत भुजबळ कोणता निर्णय घेणार आणि आपलं बळ कशाप्रकारे दाखवणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.