Suresh Dhas : संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकारण तापले आहे. सुनील धस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. अमोल मिटकरी यांच्याकडून सुरेश धस यांच्यावर काही आरोप करण्यात आली आहेत. आता अमोल मिटकरी यांच्या आरोपांना उत्तर देताना सुरेश धस हे दिसले आहेत. आता सुरेश धस यांच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहेत.
अमोल मिटकरी यांनी केलेल्या टिकेनंतर सुरेश धसांनी मोठे विधान केले. हेच नाहीतर अमोल मिटकरी, सुरज चव्हाण हे पहिली दुसरीतील मुले आहेत. याअगोदरही दोन चार वेळा मी अमोल मिटकरीला समजावले, असल्याचे धसांनी म्हटले. आता सुरेश धस यांनी खळबळजनक खुलासा केलाय. मिटकरी हा स्वत: बोलत नाहीये. मिटकरीला कोणीतरी बोलायला लावतंय. माझे म्हणणे आहे की, जो कोणी मिटकरीला बोलायला लावतंय, त्याने पुढे यावे. मी त्याला चांगले उत्तर देईल.
लक्ष्मण हाके यांनी केली सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका, म्हणाले, यांच्यामुळे हत्येचे गांभीर्य कमी झालेराष्ट्रवादीमध्ये एक मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक वरिष्ठ मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक बडी मुन्नी आहे आणि त्या मुन्नीला म्हणा…तू इथे ये…कुठे मिटकरी, सुरज चव्हाण या लहान पोरांना कशाला बोलायला लावते. मला माहितीये आणि मुन्नीला पण माहितीये मी कोणाबद्दल बोलत आहे. त्या मुन्नीने पुढे यावं. मुन्नी पुढे आल्यावर मी सुन्नी करतो असेही, थेट सुरेश धस हे म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीतील बड्या मुन्नीची सुन्नी करणार; सुरेश धसांचा खळबळजनक दावा, चर्चांना उधाण
आता सुरेश धस यांच्या या विधानानंतर विविध चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळतंय. अखेर राष्ट्रवादीमध्ये ही मुन्नी कोण आहे, जिच्याबद्दल सुरेश धस हे बोलत होते, याबद्दल जोरदार चर्चा ही रंगताना दिसतंय. अमोल मिटकरी ही बारकाली पोरं असल्याचेही सुरेश धस यांनी म्हटले आहे. सुरेश धस हे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर थेट आता राष्ट्रवादीला टार्गेट करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीही सुरेश धस यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे बघायला मिळतंय.