Sharad Pawar close aide Death : राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं निधन झालं
प्रदीप नाईक हे शरद पवार यांचे विश्वासू मानले जात होते. नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभा मतदारसंघातून त्यांनी यंदा राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र भाजप उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला होता. पराभवाचा त्यांना चांगलाच धक्का बसला होता.
Walmik Karad : ज्योती जाधव ही वाल्मिक कराडची दुसरी बायको, संतोष देशमुख यांच्या भावाचा खळबळजनक दावा
प्रदीप नाईक हे सलग तीन टर्म आमदार होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदीप नाईक प्रवेश करणार असल्याचीही चर्चा होती. मात्र त्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.
Ajit Pawar : शरद पवार-अजित पवार एकत्र यावेत, दादांच्या मातोश्रींचे पांडुरंगाला साकडे, घरातील सगळे वाद संपू देत…
सलग तीन टर्म आमदार राहिलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. पक्ष फुटीनंतरही माजी आमदार प्रदीप नाईक हे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले. त्यांना महायुतीतील घटक पक्षांकडून ऑफरही आली होती, परंतु ते एकनिष्ठ राहत प्रतिकूल परिस्थितीत किनवट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा निसटता पराभव झाला. दरम्यान त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
Pradeep Naik : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शरद पवारांना धक्का, तीन टर्म आमदार राहिलेल्या विश्वासू नेत्याचे अकस्मात निधन
प्रदीप नाईक हे मातब्बर नेता म्हणून ओळखले जायायचे. मागील २५ वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षात एकनिष्ठ असून शरद पवार यांचे विश्वासू होते. २००४, २००९ आणि २०१४ असे तीन टर्म ते किनवट मतदारसंघाचे आमदार होते. बंजारा समाजाचे नेते देखील होते. दरम्यान राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर जिल्ह्यात शरद पवारांची राष्ट्रवादी बॅकफूटवर आली. अनेक नेते अजित पवार यांच्या सोबत गेले. अश्या परिस्थितीतही ते शरद पवार सोबत खंबीरपणे उभे राहिले.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांचा ५ हजार ६४९ मतांनी पराभव झाला. भाजपचे आमदार भीमराव केराम यांना ९२ हजार २८ तर प्रदीप नाईक यांना ८६ हजार ३७९ एवढी मतं मिळाली होती. विशेष म्हणजे किनवट मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एकाही बड्या नेत्यांची सभा झाली नाही. तरी देखील प्रदीप नाईक यांनी एकट्याने खिंड लढवली होती. दरम्यान नाईक यांच्या निधनाने राजकीय वर्तुळासह किनवट आणि माहूर तालुक्यात शोककळा पसरली आहे. उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता किनवट येथील त्यांच्या गावी दहेली तांडा येथे त्यांच्या पार्थिववर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.