Tiger, Lines Point Closed Today and Tomorrow: जैवविविधतेसह वन्य जीवांच्या संरक्षणाच्या दृष्टीने घेतलेल्या या आदेशाचे पालन या विभागातील सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी व प्रशासनाने करावे, असा आदेश देण्यात आला आहे.
हायलाइट्स:
- टायगर, लाइन्स पॉइंट आज, उद्या बंद
- पोलीस बंदोबस्त सज्ज
- लेण्यांसह गडांवर दारू पिण्यास मनाई
Mumbai News: चढ्या पाऱ्यासह नववर्षाचे आगमन; राज्यात किमान तापमानात वाढ, कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज
लोणावळ्यातील कुमार चौक, रायवुड कॉर्नर, भांगरवाडी या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. वाहनचालकांची मद्यसेवनाची तपासणीही करण्यात येणार आहे. समाजविघातक, दहशतवादी, नक्षलवादी संघटनांच्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिक व बंगलेधारकांसह संबंधित व्यवसायिकांनी येणाऱ्या पर्यटक आणि प्रत्येक व्यक्तींची ओळखपत्रे व नोंदी करून घ्याव्यात; तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटिव्ही लावून घ्यावेत, अशा सूचना पोलिस प्रशासनाने हॉटेल व इतर व्यावसायिकांना दिल्या आहेत.
३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत वाद्य परवाना आहे. त्यानंतर वाद्ये वाजल्यास कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. नववर्षाचे स्वागत उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले.
लेण्यांसह गडांवर दारू पिण्यास मनाई
मावळ तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक गड-किल्ले आणि प्राचीन लेणी आहेत. नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी आशा गडकिल्ल्यांवर व लेण्यांच्या ठिकाणी दारू पिण्यास सक्त मनाई आहे. या कालावधीत भारतीय पुरातत्त्व विभागाकडील अधिकारी, कर्मचारी व पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे. त्यामुळे पर्यटकांनीही अशा ठिकाणी गैरवर्तन करू नये.
पोलिस बंदोबस्त सज्ज
यंदा नववर्षाच्या पूर्वसंध्येला शनिवार-रविवार आठवडाअखेर आणि त्यानंतर मधला सोमवारचा दिवस वगळता आज, मंगळवारी ‘थर्टी फर्स्ट’ (३१ डिसेंबर) असा ‘लाँग वीक-एंड’ असल्याने या सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण, कामशेत व वडगाव मावळ पोलिस सज्ज झाले आहेत. यासाठी अतिरिक्त पोलिस फौजफाटा मागविला आहे.