Kalyan News : घरातील प्रॉब्लेम घेऊन, ते सोडविण्या करीता एक महिला त्या भोंदू बाबाकडे गेली होती .त्यावेळी अघोरी विद्येच्या नावाखाली तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार घडकीस आल्याने खळबळ माजली आहे.
कल्याण जवळील आंबिवली मोहने परिसरात भोंदू बाबाचे संतापजनक कृत्य आले समोर आहे. घरातील प्रॉब्लेम घेऊन, ते सोडविण्या करीता एक महिला त्या भोंदू बाबाकडे गेली होती .त्यावेळी अघोरी विद्येच्या नावाखाली तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार घडकीस आल्याने खळबळ माजली आहे.
अटक करण्यात आलेल्या भोंदू बाबाचे नाव अरविंद जाधव (५०) असे असून, या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी अद्याप भोंदू बाबाला अटक केली नसल्याने पीडित महिलेने आपला संताप पत्रकाराशीं सवांद साधून व्यक्त केला आहे.
“तुझे सगळे टेन्शन मी दूर करतो”
सदर भोंदू बाबाकडे घरातील प्रॉब्लेम घेऊन ते सोडविण्या करिता पीडित महिला त्या बाबाकडे नातेवाईकासह गेली होती. त्यावेळी त्या बाबा ने “तू खूप टेन्शनमध्ये दिसत आहेस, काहीही टेन्शन घेऊ नकोस, तुझे सगळे टेन्शन मी दूर करतो,”असे बोलून त्याने तिच्यासोबत गेलेल्या नातेवाईकांना बाहेर थांबण्यास सांगितले. त्यानंतर त्या महिलेसोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. याबाबत तिने तीव्र विरोध केला असता, त्या भोंदू बाबांनी तिला व तिच्या फॅमिलीचे बरे वाईट केले जाईल अशी धमकी दिली. तरीदेखील पीडित महिलेने हिम्मत दाखवून खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन भोंदू बाबा अरविंद जाधव (५०) विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचा अधिक तपास सुरु
सदर घटनेचा महिलेच्या तक्रारी नंतर गुन्हा दाखल केल्यावर, याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले की ,महिलेच्या तक्रारीवरून बाबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तिच्यासह अन्य कोणत्या महिले अथवा मुली बाबत असा कोणता प्रकार घडला आहे का या दृष्टिकोनातून तपास चालू आहे, असे सांगितले.