Chhagan Bhujbal: भुजबळ यांनी रविवारी अवकाळी पावसाचा मुद्दा उचलत राज्य सरकारला तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.
भुजबळ यांनी रविवारी अवकाळी पावसाचा मुद्दा उचलत राज्य सरकारला तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. येवला तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, देवळा, नाशिक तालुक्यांत अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना जोरदार फटका बसला आहे. शेतात उभ्या असलेल्या गहू, कांदे, द्राक्षे, तूर, मका, हरभरा आदी पिकांचे अतीव नुकसान झाले असून शेकडो हेक्टर जमिनीवरील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
गोंदियात तीन वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला, आई ताब्यात
नाशिक जिल्ह्यातील शेतात उद्ध्वस्त झालेल्या शेती पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी भुजबळ यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे केली आ