Devki Nndan Thakur on Ladki Bahin Yojana : कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी लाडकी बहीण योजनेवरुन संशय तसंच भीती व्यक्त केली आहे. महाराष्ट्रासाठीच्या या योजनेत बांगलादेशींच्या घुसखोरीचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, लाडकी बहीन योजना ही महाराष्ट्र शासनाची सर्वात मोठी योजना आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत याची खूप चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचं सर्वात मोठं श्रेय या योजनेला मिळतं आहे. अनेक नेत्यांनीही त्यांच्या विजयाचं श्रेय लाडकी बहीण योजनेला दिलं आहे. विधानसभा निवडणुकीत आम्हाला लाडक्या बहिणींनी वाचवलं, असं म्हणत नेतेमंडळींनीही त्यांच्या विजयासाठी लाडकी बहीण योजना आणि लाडक्या बहिणींना श्रेय दिलं आहे.
‘मटा’दणका! राष्ट्रीय दुखवटा असतानाही अजय-अतुल यांच्या ऑर्केस्ट्राचे जंगी आयोजन; मटाच्या बातमीमुळे कार्यक्रम अखेर रद्द
देवेंद्र फडणवीसांना केली विनंती
देवकी नंदन ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केलं आहे. ते म्हणाले, बांगलादेशात हिंदूंविरुद्ध कट रचणाऱ्या अशा लोकांवर आपल्या देशवासीयांच्या कराचा पैसा खर्च होऊ नये, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी २७ जानेवारी रोजी प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात सनातन धर्म संसद आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
मोठी बातमी! मुंबईकरांनो ३१ डिसेंबरपर्यंत ‘हे’ काम कराच, अन्यथा बसेल दंड; BMCचा नियम काय?
बांगलादेशच्या मदतीवर नाराजी
देवकीनंदन ठाकूर यांनी बांगलादेशला तांदूळ आणि इतर मदत पाठवल्याबद्दल देखील आक्षेप घेतला. बांगलादेश जोपर्यंत हिंदूंवर होणारे अत्याचार स्वीकारत नाही आणि त्यांच्या सुरक्षेची हमी देत नाही, तोपर्यंत त्यांना कोणतीही मदत देऊ नये, असं देवकीनंदन ठाकूर म्हणाले.
‘लाडकी बहीण’मध्ये बांगलादेशी महिलांची घुसखोरी? योजनेवरुन देवकीनंदन ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
यावेळी बोलताना ठाकूर यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेत रामायण आणि भागवत यांचा समावेश करण्याची सूचना केली आहे. त्याशिवाय त्यांनी वक्फ बोर्डाला दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीवरही प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, वक्फ बोर्डाला निधी मिळू शकतो, तर सनातन बोर्डाला का नाही? त्याचा उपयोग गुरुकुल, गोशाळा आणि रुग्णालयांसाठी केला पाहिजे. अशा अनेक मुद्दांवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी फडणवीस सरकारकडे मागणी केली आहे.