Torres Ponzi Scheme Fraud : कंपनीचा सीए अभिषेक गुप्ता यांना ‘टोरेस’मधील गैरव्यवहाराबाबत कुणकुण लागली होती. त्यांनी ३० डिसेंबरला याबाबत ई-मेलवरून आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती.
पोलिसांकडून देण्यात आलेला अर्ज भरून जमा करण्यासाठी प्रत्येकाची धावपळ सुरू होती. गुन्हा दाखल झाला, तीन आरोपींना अटकही झाली, मुख्य दोघे अजूनही फरार आहेत, कंपनीची बहुतांश कार्यालये भाडेतत्वावर आहेत आणि त्यातच गोठविण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये नेमकी किती रक्कम आहे याचा थांगपत्ता नाही. त्यामुळे
प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे ‘टोरेस’ या नावाने २०२४च्या प्रारंभी मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर या शहरांमध्ये व्यवसाय सुरू करण्यात आला. आधी दागिने, नंतर कृत्रिम हिरे आणि नंतर रोख रकमेत गुंतवणूक स्वीकारून त्यावर प्रत्येक आठवड्याला पाच ते साडेअकरा टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे प्रलोभन दाखविण्यात आले. चांगला परतावा मिळत असल्याने राज्यभरातील नागरिकांनी गुंतवणूक केली. सुरुवातीला गुंतवणूकदारांना परतावा मिळाला, मात्र नंतर काही आठवडे परतावा येणे बंद झाल्याने गुंतवणूकदारांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
Pune Girl Murder : पुण्यात आयटी कंपनीतील २८ वर्षीय तरुणीला पार्किंगमध्ये संपवलं, मित्राला बेड्या, चक्रावणारं कारण
ही शंका काहीच दिवसांत सत्यात उतरली आणि लाखो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले. दादर येथील शाखेत गोंधळ उडाल्यानंतर शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून संचालक सर्वेश सुर्वे, उझबेकिस्तानी नागरिक तानिया आणि रशियन नागरिक व्हॅलेंटिना स्टोअर या तिघांना अटक करण्यात आली. सीईओ तौफिक शेख ऊर्फ कार्टर आणि व्हिक्टोरिया कोवलेंका हे आरोपी फरार आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेकडून दुर्लक्ष?
या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून दुर्लक्ष करण्यात आल्याची गुंतवणूकदारांमध्ये चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचा सीए अभिषेक गुप्ता यांना ‘टोरेस’मधील गैरव्यवहाराबाबत कुणकुण लागली होती. त्यांनी ३० डिसेंबरला याबाबत ई-मेलवरून आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही म्हणून ३ जानेवारीला त्यांनी पोलिस आयुक्तालयात भेट दिली. इतकेच नाही तर नवी मुंबई, मिरा-भाईंदर येथूनही याबाबत सावध करण्यात येत होते, अशीही गुंतवणूकदारांमध्ये चर्चा आहे.
दागिने गहाण ठेवून गुंतवणूक
शिवाजी पार्क पोलिस ठाण्याबाहेर अर्ज भरून देणाऱ्यांमधील अनेक महिलांना अश्रू अनावर झाले होते. आपण प्रयत्न करीत आहोत, योग्य रीतीने तपास होईल, असा दिलासा पोलिस गुंतवणूकदारांना देत होते. मात्र, जास्त परतावा मिळत असल्याने घरातील दागिने गहाण ठेवून पैसे गुंतविल्याचे अनेक जण सांगत होते. आता हे दागिने कसे सोडवायचे, असा प्रश्न असल्याचे सांगताना गुंतवणूकदारांच्या मनातील घालमेल दिसून येत होती.
समाजमाध्यमांवरून दिशाभूल
गुन्हा दाखल करून तिघांना अटक झाल्यावरही ‘टोरेस’ कंपनीच्या नावाने समाजमाध्यमांवर असलेल्या अकाउंटवरून गुंतवणूकदारांची दिशाभूल केली जात आहे. तौसिफ़ आणि अभिषेक गुप्ता यांची छायाचित्रे व्हायरल करून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. गुंतवणूकदारांनी घाबरून जाण्याचे कारण नाही लवकरच कंपनी पुन्हा सुरू होणार असून तुमचे पैसे परत मिळतील, असा दावा केला जात आहे. पोलिस आता समाजमाध्यमांवरील हे अकाउंट चालविणाऱ्यांचा शोध घेत आहेत. इतकेच नाही तर काही गुंतवणूकदारांना मोबाइलवर संदेश येत आहेत. कंपनी बुडाल्याची अफवा आहे. तुमचे पैसे सुरक्षित आहेत. लवकरच आम्ही तुमच्यासमोर पुन्हा येऊ, असे या संदेशांत नमूद करण्यात आले आहे.
Torres Scam : टोरेस कंपनीला मिरा-भाईंदर पोलिसांचा दणका, ९ कोटींची बँक खाती गोठवली, सर्वेश सुर्वे सापडला, आता फक्त…
विदेशातही फसवणूक?
‘टॉरेस’ या नावाने विदेशातही या कंपनीने अनेकांची फसवणूक केल्याचे म्हटले जात आहे. विशेषतः श्रीलंकेत या कंपनीने लाखो गुंतवणूकदारांना गंडा घातल्याची माहिती आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी व्हिक्टोरिया ही युक्रेनची नागरिक असल्याने इतरही देशांमध्ये अशी फसवणूक करण्यात आली आहे का, याबाबतचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.