• Thu. Jan 9th, 2025
    फडणवीसांनी ठाकरेंचे शिलेदार फोडले, पण भाजप नेत्याचीच नाराजी, पोस्टर लावलं ‘दुश्मनी जमकर करो’

    Shiv Sena UBT leaders join BJP : महापालिकेचे माजी सभागृह नेते आणि भाजपचे नेते गणेश बीडकर यांचे सहकारी विशाल दरेकर यांनी शेरोशायरी असलेले फ्लेक्स शहराच्या मध्यवस्तीत लावले आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स

    पुणे : शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पाच माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात केलेला प्रवेश स्थानिक कार्यकर्त्यांना न रुचल्याने त्यांनी थेट फ्लेक्सद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा न हों’, या शेरो शायरीद्वारे मध्य पुण्यातील राजकारणात या पक्षप्रवेशाचे फटाके फुटले आहेत.

    महापालिकेचे माजी सभागृह नेते आणि भाजपचे नेते गणेश बीडकर यांचे सहकारी विशाल दरेकर यांनी शेरोशायरी असलेले फ्लेक्स शहराच्या मध्यवस्तीत लावले आहेत. पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत पार पडल्यानंतर अवघ्या काही तासांतच हे फ्लेक्स लागले असून, त्याला राजकीय रंग आहे.

    यावर पक्षप्रवेशाबाबत काहीही लिहिण्यात आले नसले, तरी आपल्या एके काळच्या प्रतिस्पर्ध्यांना त्याद्वारे ‘मेसेज’ देण्यात आल्याची चर्चा आहे. बीडकर यांच्या निकटवर्तीयांकडून लावण्यात आलेल्या या फ्लेक्समुळे शहर भाजपमधील वरिष्ठ नेत्यांमध्येही आलबेल नसल्याची यामुळे खमंग चर्चा रंगली आहे.

    आगामी संघर्षांची नांदी ?

    ‘उबाठा’ गटातील शिवसेनेच्या पाच माजी नगरसेवकांचा प्रवेश हा भाजपच्या कार्यकर्त्यांना, स्थानिक नेत्यांना फारसा रुचलेला दिसत नाही. सगळ्याच ठिकाणी स्थानिक नेत्यांकडून नाके मुरडण्यात आली आहेत; तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतूनही याबाबत नाराजीचा सूर आळवण्यात आला आहे.
    Raj Thackeray : शिंदेंमुळे झालं हो सगळं! राज ठाकरेंच्या जवळच्या माणसाने बॉम्ब फोडला, दीड तासांच्या बैठकीत मोठी खलबतं
    विधानसभा स्तरावर उबाठा गटातील आमदारांना केवळ शिंदे गटातच प्रवेश देण्यात आला आहे. हेच सूत्र राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही आहे. असे असताना पुण्यातील माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये झालेला प्रवेश आगामी काळातील संघर्षांची नांदी ठरण्याची चिन्हे आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही स्थानिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

    Devendra Fadnavis : फडणवीसांनी ठाकरेंचे पाच शिलेदार फोडले, पण भाजप नेत्याचीच नाराजी, पोस्टर लावलं ‘दुश्मनी जमकर करो’

    पाच माजी नगरसेवकांचा भाजप प्रवेश

    दोनच दिवसांपूर्वी हिंदुत्वाचा नारा देत पुण्यातील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विशाल धनवडे, बाळा ओसवाल, प्राची आल्हाट, पल्लवी जावळे आणि संगीता ठोसर या पाच माजी नगरसेवकांनी मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
    Supriya Sule : सोबत या, तटकरेंची ऑफर, शरद पवारांच्या ७ खासदारांचा एकमुखी निर्णय, सुप्रिया सुळे चिडल्या, प्रफुल्ल पटेलांना कॉल करुन म्हणाल्या…
    भाजपच्या मुंबईत प्रदेश कार्यालयात शिवसेनेच्या या पाच नगरसेवकांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पाडला. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून शिवसेनेला खिंडार पाडण्यात यश आले. मोहोळ यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत या नगरसेवकांचा पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा केला होता.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed