Prajakta Mali Meets CM Devendra Fadnavis: प्राजक्ता माळी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचली आणि त्यांना धसांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी निवेदन दिले. यावेळी फडणवीसांनी तिला योग्य कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
प्राजक्ता माळीने शनिवारी पत्रकार परिषद घेत सुरेश धसांनी केलेल्या विधानावर भूमिका मांडली होती. यावेळी ती चांगलीत संतापली होती आणि तिने सुरेश धसांनी आपली जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली होती. तर धसांविरोधात महिला आयोगात तक्रारही दाखल केली. याच विषयी तिने आज सहकुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे आणि त्यांना तक्रारीचे निवेदन देखील दिले आहे.
प्राजक्ता माळीने या विषयावर मुख्यमंत्र्यांसोबत १५ ते २० मिनिटे चर्चा केली आहे. प्राजक्ताने हा विषय मांडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य कारवाई करणार असल्याचे प्राजक्ताला आश्वस्त केले आहे. तर ‘महिलांचा अपमान महायुती सरकार सहन करणार नाही,’ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी प्राजक्ताला दिलं आहे.