Produced byविश्रांती शिंदे | Contributed byशिल्पा नरवडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम29 Dec 2024, 9:42 pm
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आलंय. दरम्यान आज २९ डिसेंबरला पहिल्या व्यावसायिक विमानाचे यशस्वी रित्या लँडिंग झाले. काही दिवसांपूर्वी नवी मुंबई विमानतळावर वायुदलाचे सी २९५ आणि…सुखोई ३० या विमानाच्या यशस्वी लँडिंग झाले होते. त्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळाच्या रनवे वर….इंडिगो एअरलाईनसचे व्यवसायिक विमानाची लँडिंग यशस्वी रित्या झाली आहे.यशस्वी लँडिंग झाल्यानंतर विमानाला वॉटर कॅनलची सलामी देण्यात आली आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम ३१ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होईल.विमानाचे यशस्वी रित्या लँडिंग झाल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.