• Sat. Jan 4th, 2025
    Nagpur Crime: महागडं जॅकेट पाहून भिकाऱ्यावर हल्ला, मारहाणीत जीव गेला; आरोपी फरार होणार तेवढ्यात…

    Nagpur Crime News: एका व्यक्तीवर हल्ला करुन त्याची हत्या करणाऱ्या तिघांना लोहमार्ग पोलिसांनी मोठ्या शिताफिने अटक केली आहे. या तिघांनी एका अनोळखी व्यक्तीवर शस्त्राने हल्ला चढवला होता.

    महाराष्ट्र टाइम्स

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: नागपुरातीलधंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका प्रौढावर शस्त्राने हल्ला करत त्याची हत्या करुन फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना आता अटक करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

    भूषण अशोक ठाकरे (वय १९) आणि आकाश सदाशीव वाघमारे (वय २१) अशी लोहमार्ग पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे असून यापूर्वीच धंतोली पोलिसांनी मुख्य आरोपी रवी वाघाडेला अटक केली आहे. ही घटना धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारटोली परिसरातील लोहारकर हॉटेलसमोर २७ डिसेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली होती. एका ऑटोतून अनोळखी प्रौढाची हत्या करून त्यास फेकून देण्यात आले होते.

    आरोपींनी अनोळखी व्यक्तीवर शस्त्राने हल्ला करीत तसेच मारहाण करीत त्याचा खून केला व त्यानंतर त्यास फेकून दिले. पोलिसांनी सीटीव्ही फुटेजच्या आधारावर तपास सुरू केला होता. धंतोली पोलिसांनी रवीला आधीच अटक केली आहे. इतर दोन आरोपी डाऊन १२८६९ हावडा एक्स्प्रेसने पसार होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. या माहितीच्या आधारावर लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा बला यांच्या संयुक्त कारवाईत शनिवारीच इतर दोघांना भुसावळ रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली. या दोघांना धंतोली पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

    तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, अद्याप मृत व्यक्तिची ओळख पटलेली नाही. मृत व्यक्ती ही भिकारी असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, त्याच्याकडील जॅकेट महागडे होते. ते त्याने चोरले असावे, असा संशय तिन्ही आरोपींना आला. त्यामुळे त्याच्याकडून पैसे लुटल्याच्या दृष्टीने आरोपींनी त्याच्यावर वार केले. यात प्रौढाचा मृत्यू झाल्याने आरोपींनी तेथून पळून पळ काढला. त्यामुळे अद्यापही मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलिस त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न करीत आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed