Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तपासाची चक्र वेगवान फिरु लागली आहेत. याप्रकरणी आज मंजली कराड यांची आज पुन्हा चौकशी करण्यात आली. यामध्ये आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनावणे यांची देखील चौकशी करण्यात आली आहे.
संध्या सोनावणे यांच्यासह अन्य तीन जणांची सीआयडीकडून चौकशी सुरु आहे. रविवारी आठ तासांपेक्षा अधिक काळ चौकशी करण्यात आली आहे. चौकशीनंतर संध्या सोनावणेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, राजकारणात असल्याने सर्वांशी संबंध येत असतात. पण वरिष्ठांवर होत असलेल्या आरोपांबाबत मी आता भाष्य करणार नाही. तर ‘जेव्हा जेव्हा पोलीस प्रशासन बोलवेल त्यावेळी मी चौकशीला हजर राहणार असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठे अपडेट, सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी…
सोनावणे पुढे म्हणाल्या की, पोलिसांनी जे जे विचारलं त्याची माहिती मी चौकशीत दिली आहे. मी पक्षामध्ये काम करत असल्यामुळे मला तपासासाठी बोलावलं होतं. बारा वाजता मी चौकशीसाठी आले होते. राजकारणात असल्यामुळे सर्वांचे संबंध येत असतात. वरिष्ठ नेत्यांवर जी आरोप होत आहेत त्याविषयी मी आता काही बोलणार नाही. मी पहिल्यांदा अशा चौकशीला सामोरं गेली आहे.
तत्पूर्वी संतोष देशमुख हत्याकांडात वाल्मिक कराड यांच्यावर संशयाची सुई आहे. त्यांच्यावर बीड पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून कराड सध्या फरार आहेत. याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला असून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. खंडणी प्रकरणी सीआयडीने वाल्मिक कराड यांच्या पत्नीसह त्यांच्या २ बॉडीगार्डची चौकशी केली. तर आज पुन्हा मंजली कराड यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तर यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि युवती प्रदेशाध्यक्षांचीही चौकशी करण्यात आल्याने आता अजित दादांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.