Boisar Tarapur MIDC Factory Fire : बोईसर तारापूर एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग लागली असून यात तीन कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या आहेत. वेळीच कामगारांनी पळ काढल्याने जीवितहानी टळली, मात्र कंपन्यांचं लाखोंचं नुकसान झालं आहे.
आधी अगरबत्ती बनवणाऱ्या कंपनीला आग, नंतर तीन कंपन्या आगीच्या भक्षस्थानी
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक ७ मधील यु. के. ॲरोमॅटिक या अगरबत्ती आणि अगरबत्तीला लागणाऱ्या केमिकल बनवणाऱ्या कंपनीला आग लागली. आज २९ डिसेंबर रोजी रविवारी या कंपनीला सुट्टी असल्यामुळे कारखान्यात सुरक्षा कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणीही उपस्थित नव्हतं. परिसरातील कारखान्यांमधील काही कामगार, सुरक्षा रक्षकांना प्रशासनाने इतरत्र हलवलं. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली, मात्र कंपन्यांचं लाखोंचं नुकसान झालं आहे.
जीवधन किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले, आनंदाचा क्षण दु:खात बुडाला; पुण्यातील तरुणासोबत आक्रित घडलं
एकामागे एक तीन कंपन्यांमध्ये आग पसरली
बोईसर तारापूर एमआयडीसीतील तीन कारखाने या आगीच्या भक्षस्थानी आले आहेत. युके ॲरोमॅटिक्स, श्री केमिकल तसंच नंतर आदर्श टेक्स्टाईलला आग लागली.
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
आग विझवण्याकरता तारापूर एमआयडीसीच्या अग्निशमन दलासह तारापूर अणुऊर्जा केंद्र, पालघर, डहाणू आणि विरार नगरपरिषदेच्या आणि डहाणूच्या अदानी पॉवर इत्यादी ठिकाणाहून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अशा अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
Pune Fire : फोटो फ्रेम स्टुडिओत अग्नितांडव, धुराचे लोट चार किमीपर्यंत… पुण्यात भीषण आग, नागरिक धुरात होरपळले
Boisar Tarapur MIDC Fire : तारापूर एमआयडीसीतील कंपनीत अग्नीतांडव, ३ कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी; थोडक्यात बचावले कामगार
सुरक्षेच्या दृष्टीने घटनास्थळाकडे जाणारे सर्व रस्ते बंद
कारखान्यातील ज्वलनशील रसायनाचा स्फोट होऊन आग भडकत होती. तर जळतं रसायन गटारातून वाहत येत असल्याने आग रस्त्यापर्यंत पोहचली. आगीचे आणि धुराचे लोट दूरपर्यंत पसरले. घटनास्थळी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तहसीलदार रमेश शेंडगे यांच्यासह बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार उपस्थित होते. सुरक्षितेच्या दृष्टीने उपाय म्हणून पोलीसांनी घटनास्थळाकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यांमध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने कामगारांसह स्थानिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे.