Hinjewadi-Shivajinagar Metro: पुणे मेट्रोच्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम गेले अनेक महिने रखडले आहे. डिसेंबर 2025 नंतर मार्च 2026ची डेडलाइन सुद्धा हुकली असून आता संपूर्ण मेट्रोसाठी जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महामेट्रोची प्रशासकीय इमारत मेट्रोभवनच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘सध्या पुण्यात ३३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग कार्यान्वित झाला आहे. टाटा समूहाच्या सहकार्याने देशातील पहिल्या सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) असलेल्या २३ किमीच्या मेट्रो प्रकल्पाचे कामही अंतिम टप्प्यात असून, त्यापैकी १२ किमी मार्गाचे उद्घाटन मे महिन्यात, तर उर्वरित ११ किमी मार्ग जुलै महिन्यात सुरू करण्याचे नियोजन आहे. या दोन्ही प्रकल्पांसह पुण्यातील मेट्रोचे एकूण जाळे ५६ किलोमीटरपर्यंत पोहोचेल. आणखी ५५ किलोमीटरचे काम सुरू आहे.’
Pune Metro: मेट्रोतून उतरलं की रिक्षा तयार! पुण्यातील ‘नळ स्टॉप’ मेट्रो स्थानकावर प्रवाशांसाठी नवी सुविधा; किती असेल भाडे?
माण ते बालेवाडी फाटा
पुणे मेट्रो लाइन तीन माण- हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्गावर पहिल्या टप्प्यात माण ते रामनगरदरम्यान मेट्रो सेवा सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात १२ मेट्रो स्थानके सुरू होतील. या मार्गावरील मेट्रो स्थानकांची कामे आणि मेट्रोची चाचणीही पूर्ण झाली आहे. या मार्गावर मेपर्यंत मेट्रो सेवा सुरू होईल. बालेवाडी हायस्ट्रीट ते शिवाजीनगर जिल्हा न्यायालय मार्गावर जुलैमध्ये मेट्रो सेवा सुरू होईल. या मार्गावर ११ मेट्रो स्थानके असतील. मेट्रोचा पूर्ण मार्ग सुरू होण्यास जुलै उजाडेल.
अंतिम मुदत पुन्हा हुकली
पुणे मेट्रो लाइन तीन हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम डिसेंबर २०२५पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते; पण पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाच्या कामास उशीर झाल्यामुळे काम पूर्ण करण्यास मार्च २०२६पर्यंत मुदतवाढ दिली होती. नागरिकांना हा मार्ग सुरू होण्याची मोठी प्रतीक्षा आहे; पण आतापर्यंत दोन वेळा मार्ग सुरू होण्याची ‘डेडलाइन’ हुकली आहे.
Pune Metro: पुण्यात मेट्रो स्थानकांपासून ‘फीडर बस’सेवेसाठी पावले, PMPला नवा पर्याय; पहिल्या टप्प्यात दोन मार्गांसाठी प्रस्ताव
असा आहे मेट्रो 3चा मार्ग
‘पुणे मेट्रो लाइन तीन’ हा हिंजवडीच्या ‘आयटी हब’ला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणारा २३ किलोमीटरचा उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्प आहे. हा सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) प्रकल्प आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे (पीएमआरडीए) टाटा समूहाला उभारणीसाठी दिला आहे. हा प्रकल्प डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर तत्त्वावर करण्यासाठी पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेड ही विशेष उद्देश कंपनी स्थापन केली असून, त्यांच्याद्वारे ३५ वर्षांच्या सवलतीसाठी विकसित आणि ऑपरेट केला जाणार आहे.
