• Mon. Dec 30th, 2024
    दादांचा विश्वासू शिलेदार नाराज; अद्याप स्वीकारला नाही मंत्रिपदाचा कार्यभार, परदेशी रवाना

    मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबरला संपन्न झाला. त्यानंतर ६ दिवसांनी खातेवाटप जाहीर झालं. यानंतर नव्या मंत्र्यांनी मंत्रालयात जात कार्यभार स्वीकारले. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या एका विश्वासू शिलेदारानं अद्याप मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारलेला नाही.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे: मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबरला संपन्न झाला. त्यानंतर ६ दिवसांनी खातेवाटप जाहीर झालं. यानंतर नव्या मंत्र्यांनी मंत्रालयात जात कार्यभार स्वीकारले. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या एका विश्वासू शिलेदारानं अद्याप मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारलेला नाही. अजित पवारांचे निष्ठावान सहकारी मंत्रिपदाचा चार्ज न घेता परदेशी रवाना झाले आहेत. त्यांच्या मतदारसंघात नाराजीची चर्चा जोरात आहे.

    मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला ९ मंत्रिपदं आली. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांनी काहींना डच्चू देत त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली. बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या दत्तात्रय भरणेंना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. त्यांना क्रीडा मंत्रालय देण्यात आलं. याआधीच्या सरकारमध्ये हे खातं राष्ट्रवादी काँग्रेसच्याच संजय बनसोडे यांच्याकडे होतं. बनसोडे यांना फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही.
    भरधाव टेम्पोनं घाटकोपरमध्ये ५ ते ६ जणांना चिरडलं, एका महिलेचा मृत्यू; चालक ताब्यात
    क्रीडा मंत्रालय मिळाल्यानं दत्तात्रय भरणे नाराज असल्याचं कळतं. त्यामुळेच त्यांनी अद्याप मंत्रिपदाचा कार्यभार हाती घेतलेला नाही. खातेवाटप होऊन आठवडा उलटला आहे. पण भरणेंनी मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा जोर धरु लागली आहे. भरणे त्यांच्या कुटुंबासह परदेशात सुट्टीवर गेले आहेत. कार्यकर्ते त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण भरणे परदेशात असल्यानं त्यांच्याशी संपर्क होत नाहीए.

    दत्तात्रय भरणे सलग तिसऱ्यांदा इंदापूरमधून विजयी झाले आहेत. त्यांनी सलग तीनदा हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला आहे. पाटील १९९५ ते २०१४ अशी १९ वर्षे इंदापूरचे आमदार राहिले. या कालावधीत त्यांनी अनेक मंत्रिपदं भूषवली. अजित पवारांचा पाटील यांच्याशी कायमच संघर्ष राहिला. त्यातूनच त्यांनी इंदापुरात भरणेंच्या पाठिशी ताकद उभी केली. अखेर २०१४ मध्ये भरणेंनी पाटील यांना पराभवाचा धक्का दिला. २०१९ मध्येही त्यांना पाटलांना धूळ चारली.
    पुणे-दानापूर ट्रेनच्या चाकांमध्ये झोपून तरुणाचा २५० किमी प्रवास; रेल्वे कर्मचारी चक्रावले
    राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये त्यांना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृदा आणि जलसंधारण, वन, पशुसंवर्धन, मत्स्योद्योग, ओबीसी विकास या खात्यांचं राज्यमंत्रिपद देण्यात आलं होतं. यासोबतचे सोलापूरचे पालकमंत्रिदेखील होते.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed