जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आयटीआय चौकात एक तरुण चालत्या एसयूव्हीच्या छतावर चढला. त्यानं वाहन चालवणाऱ्या डॉक्टरवर हल्ला चढवला. तरुण थेट कारवर चढला.
डॉ. प्रकाश नागरगोजे यांचं लोहा तहसीलमधील मालकोलीमध्ये रुग्णालय आहे. ते नेहमीप्रमाणे आजही त्यांच्या फॉर्च्युनर कारनं नांदेडहून रुग्णालयात जात होते. त्यावेळी आयटीआय चौकात एक तरुण त्यांच्या कारवर चढला. नागरगोजे यांनी हॉर्न वाजवल्यानं तरुण संतापला होता. तो संतापाच्या भरात त्यांना मारहाण करु लागला. शुक्रवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली.
दादांचा विश्वासू शिलेदार नाराज; अद्याप स्वीकारला नाही मंत्रिपदाचा कार्यभार, परदेशी रवाना
तरुणाला अनेकदा कारवरुन उतरण्यास सांगूनही तो ऐकत नव्हता. तो डॉक्टरांना मारहाण करण्याचा प्रयत्न करत होता. कारच्या काचेवर जोरजोरात पाय आपटत होता. त्यामुळे प्रसंगावधान राखत डॉक्टरांनी कार थेट पोलीस ठाण्यात नेण्याचा निर्णय घेतला. कार पोलीस ठाण्याच्या दिशेनं जात असताना छतावर असलेला तरुण ड्रायव्हिंग करत असलेल्या डॉक्टरांना मारहाण करण्याचा प्रयत्न करत होता.
आयटीआय चौकात उपस्थितीत असलेल्या काहींनी घटनेचं चित्रीकरण केलं. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विशेष म्हणजे रस्त्यावर असलेल्या गर्दीतील कोणीही डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. डॉ. नागरगोजेंनी पोलीस ठाणं गाठत तिथल्या कर्मचाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी तरुणाला लगेचच ताब्यात घेतलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
भरधाव टेम्पोनं घाटकोपरमध्ये ५ ते ६ जणांना चिरडलं, एका महिलेचा मृत्यू; चालक ताब्यात
मी दररोज त्याच रस्त्यानं रुग्णालयात जातो. पण असा प्रकार माझ्यासोबत पहिल्यांदाच घडला, असं डॉ. नागरगोजे यांनी सांगितलं. पोलिसांनी घटनेचा तपास हाती घेतला आहे. आरोपी तरुणाला कठोर शिक्षा दिली जाईल, असं आश्वासन पोलिसांकडून डॉक्टरांना देण्यात आलं आहे.