• Fri. Mar 20th, 2026
    Nashik News : डॉ. मनिषा जेजुरकर प्रकरणात निलेश जेजुरकरांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

    नाशिकमधील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनिषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. डॉ. निलेश जेजुरकर यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

    डॉ. निलेश जेजुरकर यांना तात्पुरता दिलासा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञ डॉ. मनिषा जेजुरकर यांच्या आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात डॉ. मनिषा यांच्या नातेवाईकांनी आरोप केलेल्या डॉ. निलेश जेजुरकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर १६ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

    डॉ. निलेश जेजुरकर यांच्याविरुद्ध डॉ. मनिषा जेजुरकर यांच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार आहेत. त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून सोमवारी त्यावर सुनावणी होणार आहे.

    अटकपूर्व जामिनावर न्यायालय काय निर्णय देणार?

    डॉ. निलेश जेजुरकर यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर सुनावणी करताना न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

    Maharashtra TimesSolapur News : पत्नी पोलीस दलात, स्वत: एसआरपीएफमध्ये; जवानाने अचानक स्वतःला संपवलं, हसता-खेळता संसार उद्ध्वस्त

    नातेवाईकांचे गंभीर आरोप

    डॉ. मनिषा जेजुरकर यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी डॉ. निलेश जेजुरकर यांच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. तसेच डॉ. मनिषा यांच्या आत्महत्येस तेच जबाबदार असल्याचा आरोपही नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.

    निलेश जेजुरकर हे नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात मानसोपचार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

    Maharashtra TimesLakhpati Didi Yojana : ग्रामीण रणरागिणींची दमदार भरारी; 37 लाख ‘लखपती दीदी’, आता 25 लाख नव्या उद्योजकांचं लक्ष्य

    दरम्यान, गंगापूर रोड परिसरातील डी. के. नगर येथे राहणाऱ्या प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञ डॉ. मनिषा जेजुरकर (वय ४०) यांनी ६ मार्च रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास राहत्या घरी खिडकीच्या लोखंडी रॉडला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. बेशुद्ध अवस्थेत त्यांना दुपारी २.४० वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा