• Sat. Dec 28th, 2024
    बर्थडे पार्टीहून परतताना मायलेकावर काळाचा घाला; ऑटोरिक्षा उलटली अन्… घटनेने पंचक्रोशीत हळहळ

    Nagpur News : नागपूर शहराच्या हिंगणा येथील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भरधाव ऑटो दुभाजकावर धडकून उलटून भीषण अपघात घडला आहे. या अपघातात ऑटो चालकासह त्याच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

    Lipi

    नागपूर : नागपूर शहराच्या हिंगणा येथील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भरधाव ऑटो दुभाजकावर धडकून उलटून भीषण अपघात घडला आहे. या अपघातात ऑटो चालकासह त्याच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोहित गोपाल साखरे (25) आणि त्याची आई करुणा गोपाल साखरे (वय 49) असे मृतकांचे नावे आहेत. रोहित गोपाल साखरे हा ऑटो चालक असून त्याची आई करुणा गोपाल साखरे ही अंगणवाडी सेविका होती. हे दोघेही रोहितच्या चुलत बहिणीकडे वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले होते त्यानंतर घरी परतताना ही दुर्दैवी घटना घडली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले.

    पोलिसांच्या माहितीनुसार मृतक रोहित आणि त्याची आई रोहितच्या चुलत बहिणीकडे वाढदिवसाला गेले होते. दरम्यान कार्यक्रम आटपून रात्री ऑटोने घरी परत असताना रोहित हा फार वेगाने ऑटो चालवत होता. त्यामुळे त्याचे ऑटोवरील नियंत्रण सुटले. यातच भरधाव गतीने ऑटो दुभाजकावर आदळला आणि त्यानंतर ऑटो रस्त्यावर उलटला. त्यामुळे चालक रोहित आणि मागच्या प्रवासी सीटवर बसलेली त्याची आई करुणा दोघांनाही डोक्यावर आणि हातापायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
    Raigad News : आनंदाचा क्षण दु:खात बुडाला, पुण्यातील शिक्षकासोबत काशीद समुद्रावर अनर्थ घडला
    एमआयडीसी-वाडी मार्गाने जाणाऱ्या काही नागरिकांनी या अपघाताची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळाल्यानंतर ठाणेदार महेश चव्हाण आणि त्यांचा स्टाफ हा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. तर या घटनेत एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed