Jalgaon News : जळगावात भरधाव डंपरने दुचाकीवरुन जाणाऱ्या मामा-भाच्याला जोरदार धडक दिली. या धडकेत ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त जमावाने डंपर पेटवला. पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात अपघातांची मालिकाही सुरूच आहे. बुधवारी संध्याकाळी २५ डिसेंबर रोजी रात्री ७.१५ वाजेच्या सुमारास कालिका माता मंदिराजवळ ही घडली आहे. या अपघातात ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून त्याच्या सोबत असलेली त्याची बहीण आणि मामा हे दोघे जखमी झाले आहे. योजस धीरज बऱ्हाटे (वय-९ रा. लीला पार्क, अयोध्या नगर) असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. या घटनेमुळे जळगाव शहरातील संतप्त नागरिकांकडून डंपर पेटवून देण्यात आला.
मुंबई-ठाण्यात धावणार केबल टॅक्सी, नव्या परिवहन मंत्र्यांकडून प्रवाशांसाठी Good News, नव्या प्रयोगाचे प्रवाशांसाठी काय फायदे?
मामासोबत बाईकवर निघालेले भाचे
योजस आपल्या आई – वडील आणि बहीण भक्ती धीरज बऱ्हाटे (वय १३) यांच्यासोबत अयोध्या नगरातील लीला पार्क परिसरामध्ये वास्तव्याला होता. बुधवारी २५ डिसेंबर रोजी त्यांचा भादली येथील मामा योगेश हरी बेंडाळे हे त्यांच्या घरी आले होते.
खेळताना गंभीर अपघात; नावाजलेल्या कबड्डीपट्टूने मुंबईत घेतला अखेरचा श्वास, रत्नागिरीत हळहळ
संध्याकाळी जेवणाचं पार्सल घेण्यासाठी योगेश बेंडाळे हे सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास भाची भक्ती आणि भाचा योजस त्याच्यासोबत दुचाकीने कालिका माता चौकातून जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत योजस बऱ्हाटे हा चिमुकला जागीच ठार झाला. त्याची बहीण भक्ती आणि मामा योगेश बेंडाळे हे जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच अजिंठा चौकात उभा असलेला डंपर संतप्त नागरिकांनी पेटवून दिला. त्यामुळे येथे तणावाचं वातावरण निर्माण झाले होतं. डंपरला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं होतं.
नैनीतालमध्ये भीषण अपघात, बस खोल दरीत कोसळली; घटनेचा भयंकर Video समोर
मामा-भाचे दुचाकीवर निघाले; इतक्यात डंपरची जोरदार धडक अन् चिमुकल्यासोबत घडला अनर्थ, संतप्त नागरिकांनी डंपर पेटवला
पोलिसांकडून लाठी चार्ज
दुचाकीला रस्त्यातच मागून येणाऱ्या भरधाव डंपरने धडक दिल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. संतप्त जमावाने डंपर पेटवला. मोठ्या संख्येने लोक इथे जमा झाले होते. यावेळी संतप्त जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना जमावावर लाठी चार्ज करावा लागला.