Satish Wagh Murder Big Update: आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी खळबळजनक वृत्त समोर आले आहे. सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे.
उद्योजक असलेले योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ हे ९ डिसेंबरला मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. यादरम्यान ब्ल्यू बेरी हॉटेल बाहेरुन त्यांचे अपहरण करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला. पण त्याच दिवशी रात्री घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सतीश वाघ यांची हत्या करणारा त्यांची जवळचीच असल्याची आधी चर्चा होती. त्याप्रमाणेच आता त्यांची पत्नीच दोषी ठरली आहे. पोलिसांनी पत्नी मोहिनी वाघ (वय 48) यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत मोहिनी वाघांसह आणखी चार जणांना अटक केली आहे.