Nashik Harsul Earthquake Tremors: त्र्यंबकेश्वर येथे तहसील कार्यालयात आपत्ती निवारण कक्ष नाही. केवळ पावसाळ्यात दरड कोसळते म्हणून काही दिवस ते स्थापन करण्यात येतात.
हायलाइट्स:
- भूकंपाच्या धक्क्याने हरसूल हादरले
- लेकरांसह गावकऱ्यांनी रात्र काढली जागून
- सतत बसणाऱ्या हादऱ्यांनी धास्ती वाढली
Palghar News : दहा लाखांची लाच घेताना वनाधिकारी जाळ्यात, घरात १.३७ कोटींची रोकड, ५८ तोळे सोनं जप्त, मिरा रोडमध्ये खळबळ
…या उणिवा व्हाव्यात दूरत्र्यंबकेश्वर येथे तहसील कार्यालयात आपत्ती निवारण कक्ष नाही. केवळ पावसाळ्यात दरड कोसळते म्हणून काही दिवस ते स्थापन करण्यात येतात. भूकंप, वादळ अथवा बिगरमोसमी ढगफुटीसारख्या घटनेची शक्यता वाटल्यास कोणाकडे विचारणा करायची याची माहिती नागरिकांना उपलब्ध नाही. शासकीय यंत्रणांचे कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने मंगळवारी स्थानिकांना दिलासा मिळू शकला नाही. अखेर हा भूगर्भातील हालचालींचा परिणाम असून, घाबरण्याचे कारण नाही, असा निर्वाळा भूगर्भ शास्त्रज्ञांच्या हवाल्याने प्रशासनाकडून बुधवारी देण्यात आला. हरसूल भागातील ५८ गावांची लोकसंख्या एक लाखाच्या आसपास आहे. दुर्दैवी घटना घडल्यास तेथे मदतीसाठी वाघेरा, करंजाळी असे घाटरस्तेच आहेत. त्यामुळे येथे मोबाइल नेटवर्कसह कायमस्वरूपी बिनतारी संदेश यंत्रणा गरजेची बनल्याचे मंगळवार घटनेने स्पष्ट झाले.