Produced byविश्रांती शिंदे | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम21 Dec 2024, 9:56 pm
आज अजित पवार १३ दिवसानंतर बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची…भेट घेण्यासाठी दाखल झाले होते. ते कशासाठी आले हे आम्हाला कळलं नाही.त्यांनी आमच्याशी थोडा बोलायला हवं होतं, म्हणणं तरी ऐकून घ्यायला पाहिजे होतं.अजित पवार यांच्या गावकऱ्यांचा अपमान करण्यासाठी आले होते का? आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तरी त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही.मी सर्व ठीक करतो असं म्हणणाऱ्या दादांनी तेरा दिवस झाले तरी काही केलं का? हा पहिला प्रश्न एक महिला म्हणून माझा आहे, असं यावेळी संजीवनी देशमुख म्हणाल्या. उद्या संध्याकाळपर्यंत राहिलेल्या तीन आरोपींना अटक झाले पाहिजे. हे प्रकरण लगेच फास्टट्रॅक मध्ये चालवावे, नाहीतर लाडक्या बहिणी सोडणार नाहीत हा शब्द आहे.