• Fri. Jan 10th, 2025
    उद्धव ठाकरेंनी एक गोष्ट ऐकावी, उदय सामंत यांचा सल्ला, तानाजी सावंतांबद्दल म्हणतात…

    Uday Samant on Uddhav Thackeray : शिवसेनेची संख्या कमी झाल्या संदर्भात आत्मचिंतन या प्रशिक्षण कार्यशाळेत करावे असा सल्ला मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

    महाराष्ट्र टाइम्स

    नागपूर : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे मंगळवारी विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांना प्रशिक्षण देणार आहेत. नवीन आमदारांना प्रशिक्षण देणे काही वावगे नाही पण शिवसेनेची संख्या कमी झाल्या संदर्भात आत्मचिंतन ही या प्रशिक्षण कार्यशाळेत करावे असा सल्ला मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

    शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत, नरेंद्र भोंडेकर हे मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत, तानाजी सावंत यांनी डीपीवरून शिंदेंचाही फोटो काढला आहे, यासंदर्भात सामंत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की शिंदे साहेब हे बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालत आहे, मंत्रीपद मिळाले नाही म्हणून काही काळ नाराजी असेल, पण आम्ही बारा मंत्री त्यांना मंत्रीपदासारखेच सन्मान देऊ त्यांची किरकोळ नाराजी दूर करू, असे सामंत म्हणाले.

    शिंदेंना गृहमंत्री पद मिळावे यासाठी शिवसेना आग्रही असल्याचा संदर्भात प्रश्न विचारला असता सामंत म्हणाले की आग्रह धरणे, दावा करणे हा आमचा अधिकार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या नेत्याला मोठे पद मिळावे अशी इच्छा असते, असेही उदय सामंत म्हणाले.
    Ajit Pawar : दादा बंगल्यावर नाहीत; अजित पवार २४ तासांपासून कुणालाही भेटले नाहीत, चर्चांना उधाण

    सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूचा मुद्दा पेटला

    ‘परभणी येथे पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे या विषयावर सभागृहात चर्चा करावी’, असा मुद्दा नाना पटोले आणि नितीन राऊत यांनी उपस्थित केला. १० डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी परभणी बंद दरम्यान शहरात दगडफेक जाळपोळच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

    Uday Samant : उद्धव ठाकरेंनी एक गोष्ट ऐकावी, उदय सामंत यांचा सल्ला, तानाजी सावंतांबद्दल म्हणतात…

    Rupali Patil : अजितदादांच्या प्रतिमेला जोडे काय मारता? रुपाली पाटील खवळल्या, भुजबळांना म्हणाल्या, तुम्ही तुमच्या…
    संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये झालेल्या आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या अहलावात एक धक्कादायक बाब नमूद करण्यात आली आहे. ती म्हणजे बेदम मारहाणीमुळे सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता यावर चर्चा करावी, अशी मागणी विरोधकांनी केली. या विषयावर उद्या बुधवारी चर्चा करू आज सभागृहाचे कामकाज चालू द्या, असे सभापती म्हणाले. मात्र विरोधक आपल्या मुद्द्यावर ठाम असून चर्चा करावी, अशी मागणी लावून धरली.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed