• Thu. Jan 9th, 2025
    मला राज्यसभा हवी होती, तेव्हा सुनेत्रा ताईंना पाठवलं, मग काय बोलणार? भुजबळांची खदखद

    छगन भुजबळांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्याकडे बोट दाखवलं आहे. येवल्यात समता परिषदेच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक झाल्यानंतर भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नाशिक : लोकसभा निवडणुकीला ऐनवेळी माझं नाव पुढे केल्यामुळे मी माघार घेतली, नंतर राज्यसभेची संधी आल्यावर मी इच्छा व्यक्त केली, तर सुनेत्रा ताईंचं नाव आलं, त्यामुळे काही बोलताच आलं नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. मी काय लहान खेळणं आहे का? असा सवाल विचारत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला मंत्रिमंडळात घेण्याची इच्छा होती, मात्र तसं झालं नाही, असं म्हणताना छगन भुजबळांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्याकडे बोट दाखवलं आहे. येवल्यात समता परिषदेच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक झाल्यानंतर भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला.

    छगन भुजबळ काय म्हणाले?

    लोकसभेवर मी जातो म्हणालो, ऐनवेळी तुम्ही कच खालली, नाव जाहीर नाही केलं, राज्यसभेची जागा आली, मी म्हटलं मला जाऊ द्या, त्यांनी सांगितलं सुनेत्रा ताईंना पाठवायचं आहे, मी म्हटलं ठीक आहे, मी आता काही बोलतच नाही, दुसरी जागा आली, तिथे मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना संधी दिली. मी म्हटलं, अरे मला जाऊद्या, माझा फायदा पक्षाला होईल, मी ४० वर्ष इथे आहे, तर म्हणाले की मी त्यांना शब्द दिला आहे, तुम्ही महाराष्ट्रात असणं पक्षाची गरज आहे, तुम्ही लढलं पाहिजे, आम्ही लढलो आणि लढल्यावर आता सांगतात, तुम्ही राज्यसभेवर जा, कारण मकरंद पाटलांना त्यांना मंत्री करायचंय, त्यांनी ते केलं, त्यांच्या भावाला सांगणार तू राजीनामा दे आणि खाली ये, मला सांगणार राजीनामा दे आणि वरती जा, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला

    Chhagan Bhujbal : मला राज्यसभा हवी होती, तेव्हा सुनेत्रा ताईंना पाठवलं, मग काय बोलणार? भुजबळांची खदखद; म्हणतात लहान खेळणं आहे का मी?

    Rupali Patil : अजितदादांच्या प्रतिमेला जोडे काय मारता? रुपाली पाटील खवळल्या, भुजबळांना म्हणाल्या, तुम्ही तुमच्या…

    भुजबळांनी सांगितलेले प्रमुख मुद्दे

    – राष्ट्रवादीचे सर्व निर्णय अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल घेतात
    – देवेंद्र फडणवीस यांनी माझा मंत्रिमंडळात सामावेश करावा असे सांगितले, पण अजित दादांनी शेवटच्या क्षणापर्यंत ऐकले नाही
    – फडणवीस माझ्यासाठी आग्रही होते
    – प्रश्न मंत्रिपदाचा नाही तर ज्या पद्धतीने अवहेलना करण्यात आली त्याचा आहे
    Uday Samant : उद्धव ठाकरेंनी एक गोष्ट ऐकावी, उदय सामंत यांचा सल्ला, तानाजी सावंतांबद्दल म्हणतात…
    – लोकसभा निवडणुकीतही असाच खेळ खेळला गेला
    – मला राज्यसभा जेव्हा पाहिजे होती, तेव्हा दिली नाही
    – मी लहान खेळणं आहे का तुमच्यासाठी
    – अजित पवार यांच्याशी माझा संपर्क नाही, पटेल, तटकरे संपर्कात आहेत
    – तुम्ही उठ म्हणाले की उठ आणि बस म्हणाले की बस ऐकणारा छगन भुजबळ असा मनुष्य नाही

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed