Makrand Patil Oath: राज्यपाल शपथेचा कागद हातात घेऊन तयार. ते नव्या मंत्र्यांना शपथ देऊ लागले आणि प्रशासनाच्या लक्षात आले की एक मंत्री अद्याप पोहचलेलेच नाहीत.
खूप वर्षांनंतर नागपुरात राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होत होता. राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते आपल्या वाहनाने आले होते. त्यांनी राजभवन परिसरात गर्दी केली होती. तीन दिशांनी येणारे वाहने एकाच ठिकाणी येऊन एकमेकांसमोर येऊन उभी राहिल्याने गोंधळ झाला. पोलिसांनी वाहतुकीचे नीट नियंत्रण केले नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा वाहतूक कोंडीत अडकले होते. आमदार मकरंद पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. ते शपथ घेण्यासाठी परिवारासह राजभवनच्या दिशेने निघाले, वाहतूक कोंडीत अडकले. तिकडे शपथविधीची वेळ जवळ येऊ लागली. प्रोटोकॉलचे फोन धडकू लागले. त्यांची गाडी समोर सरकेना. अखेर मंत्रिमंडळाच्या शपथविधीला प्रारंभही झाला. तरीही मंत्री आलेलेच नव्हते. शेवटी एका पोलिसाने दुचाकीवर बसवून त्यांना राजभवनात आणले. ते व्यासपीठावर चढले तेव्हा एक-दोन मंत्र्यांनी शपथ घेतली होती.
यंदाचे हिवाळी अधिवेशन म्हणजे देखावा! विरोधकांचा हल्लाबोल, सत्ताधारी लक्ष्य
शपथविधीस उपस्थित असलेल्या मान्यवरांना सोडून त्यांच्या गाड्या सदर गेटमधून बाहेर पडल्या. त्या परत त्यांना घेण्यास कशा येणार? राज्यभरातून आलेल्या लोकांना मार्ग कसे कळणार हा गोंधळ झालाच.
रस्ता बंद, जायचे कसे ?
शपथविधी सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांना दोन क्रमांकाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात आला. काहींनी गाड्या बाहेरच पार्क केल्या तर काहींना आत सोडण्यात शपथविधी आटोपल्यानंतर आले. सोहळा ज्या प्रवेशद्वारातून प्रवेश दिला, ते द्वार बंद करण्यात आले. पायी जात गेट क्रमांक तीनमधून बाहेर निघण्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अखेर गाडीपर्यंत पोहोचण्यासाठी अनेकांना सुमारे दीड किलोमटीर पायी चालत अंतर कापावे लागले. शपथविधी सोहळ्याला झालेल्या गर्दीमुळे अनेकांची गैरसोय झाली. राजभवन परिसरात करण्यात आलेल्या व्यवस्थेपेक्षा अधिक क्षमतेने नेत्यांचे कार्यकर्ते उपस्थित झाल्याने काहीसा गोंधळ उडाला