लग्नाचा हंगाम सुरू होत असतानाच अचानक उद्भवलेल्या युद्धामुळे पाहुण्यांना सुग्रास जेवण पुरवणाऱ्या केटररतर्फे यजमानांना अशी नवीनच अट घालण्यात येत आहे. लग्नाची तारीख निश्चित झाल्याने ‘मेन्यू’ यापूर्वीच अंतिम झाला आहे. परंतु अचानक परिस्थितीत बदल झाल्याने आधी घेतलेली ऑर्डर पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करताना केटररच्या नाकीनऊ आले आहेत. ‘सिलिंडरअभावी पदार्थ कमी करा किंवा पाहुणे कमी बोलवा,’ अशी विनंती ते ग्राहकांना करीत आहेत. समजूतदार ग्राहक ही विनंती मान्य करीत आहेत. मात्र, ‘शेकडो पाहुणे येणारच,’ असे म्हणणाऱ्यांना ‘तुम्हीच सिलिंडरची सोय करा,’ असे सांगावे लागत असल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले.
Mumbai Pune Expressway: मुंबईकडे मासे घेऊन निघालेला कंटेनर खंडाळा घाटात पलटला; वाहतूक सुरळीत करण्यासाठी यंत्रणांकडून युद्धपातळीवर प्रयत्न
‘करोनानंतर गॅसटंचाई ही केटरिंग व्यावसायिकांसाठी दुसरी मोठी आपत्ती ठरली आहे. ग्राहकही समजून घेऊन पदार्थ कमी करीत आहेत. आता पाहुण्यांची संख्याही एक तृतीयांशपर्यंत कमी करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. तरीही सिलिंडरच्या उपलब्धतेची खात्री देता येत नाही, असे केटरिंग व्यावसायिकांनी सांगितले.
‘जे ग्राहक अडून बसत आहेत त्यांना तुम्ही सिलिंडर आणून द्या, असे सांगावे लागत आहे,’ असे केटरिंग व्यावसायिकांनी सांगितले. ‘उपलब्ध सिलिंडर पुरवून वापरत आहोत. नव्या ऑर्डर घेणे बंद केले असून, पूर्वीच्याच ऑर्डर कशा पूर्ण करायच्या याचीच चिंता आहे,’ असे केटरिंग व्यावसायिक सोनल जोशी यांनी सांगितले.
Pune Crime : प्रेमसंबंधाच्या वादातून भाचीला त्रास, समजवायला गेलेल्या मामाचा जीव घेतला, पुण्यात 28 वर्षीय तरुणाचा बळी
केटरिंग व्यवसायावर मोठी अर्थसाखळी अवलंबून आहे. या व्यवसायासाठी लागणाऱ्या कच्च्या मालापैकी बहुतांश माल हा नाशवंत असतो. तो फेकून द्यावे लागेल. ऑर्डर नसेल, तर आम्हाला कर्मचारीही कमी करावे लागतील. सरकारने कोणाच्याही पोटावर पाय आणू नये. केटरिंग व्यावसायिकांना दिवसाला किमान एक किंवा दोन व्यावसायिक सिलिंडर नियमित उपलब्ध करावेत. –सचिन देवधर, केटरिंग व्यावसायिक
सिलिंडर मिळत नसल्याने उद्या सायंकाळी डायनिंग हॉल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तर शनिवार-रविवारी दोन्ही वेळेस डायनिंग हॉल चालू ठेवता येईल. डायनिंग हॉलशिवाय बाहेरील ऑर्डर तूर्त बंद केल्या आहेत. पुढील आठवड्यात परिस्थिती अशीच राहिली, तर सायंकाळी डायनिंग हॉल बंद ठेवावा लागेल. –हेमंत राजवाडे, आशीर्वाद डायनिंग हॉल, कोथरूड
