• Mon. Sep 7th, 2026
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहा फक्त एका क्लिकवर


Live News In Marathi: विधानभवन, उच्च न्यायालय आणि मुंबई स्टॉक एक्स्चेंज येथे गुरुवारी धमकीचे ई-मेल आल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ सर्व ठिकाणी जाऊन तपासणी केली. परंतु ही अफवाच असल्याचे उघड झाले. विधानभवनच्या सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात बोगस मेल केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय ध्वज लावलेल्या जहाजांना सुरक्षितपणे जाण्याची परवानगी दिली आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर या मार्गावरील सागरी वाहतूक थांबली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed