• Sat. Dec 28th, 2024
    शाळा सुटल्यावर रुद्र घरी निघाला, अचानक सायकलवरचा ताबा सुटला अन् चिमुकल्यासोबत आक्रीत घडलं

    10 year boy Died in Road accident: जळगावमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. १० वर्षीय चिमुकला ट्रॅक्टरखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

    Lipi

    निलेश पाटील, जळगाव : जळगावमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. १० वर्षीय चिमुकला ट्रॅक्टरखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. शाळा सुटल्यावर रुद्र सायकल वरून शक्तिधामच्या दिशेने खेळण्यासाठी जात असताना त्याच्यावर काळाने घाला घातला आहे. मुलगा सायकलवरुन जात असताना समोरून ट्रॅक्टर येत होती इतक्यात त्याचा सायकलवरचा ताबा सुटला आणि तो ट्रॅक्टरच्या चाकाखाली आला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

    १० वर्षीय रुद्र हा पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील राजीव गांधी कॉलनीत आपले आईवडील, भाऊ आणि आजीसोबत वास्तव्यास होता. तो शिंदे माध्यमिक विद्यालयात इयत्ता तिसरीत शिकत होता. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर रुद्र हा सायकल घेऊन शक्तीधामच्या दिशेने खेळण्यासाठी निघाला. पण समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरला पाहून रुद्रचा सायकलवरुन तोल गेला आणि तो थेट ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली आला. यामध्ये त्याच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.
    Fact Check : AI इंजिनिअर अतुल सुभाष यांच्या पत्नी निकिता सिंघानियाचा फेक फोटो व्हायरल? फोटोचं सत्य जाणून घ्या
    या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच रुद्रचे आईवडील घटनास्थळी झाले तेव्हा त्यांनी हंबरडा फोडला. घटनास्थळाहून रुद्रचा मृतदेह मुकेश पाटील (पुनगाव) यांनी रुग्णवाहिकेतून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. रुद्रच्या कुटुंबीयांसह परिसरात शोककळा पसरली आहे.

    घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये जितेंद्र गोसावी यांच्या तक्रारीवरुन ट्रॅक्टर चालक विजय उर्फ बबलु अशोक थोरात यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार पांडुरंग सोनावणे करत आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *