• Mon. Sep 7th, 2026

पिंकी मालीच्या घरून निघताना लिफ्ट प्रवास टाळला; जय पवार १८ मजले पायी उतरले

पिंकी मालीच्या घरून निघताना लिफ्ट प्रवास टाळला;  जय पवार १८ मजले पायी उतरले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिवंगत नेते अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी बारामती विमान अपघातात अजित पवार यांच्यासोबत निधन झालेल्या पिंकी माली हीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पिंकी माली हीच्या आईची प्रकृती ठीक नसल्याने जय पवार यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली. माली कुटुंबीयांच्या भेटीनंतर जय पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. जय पवार यांची सोमवारी पत्रकार परिषद होणार होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आल्याबाबत त्यांनी माहिती दिली. आमच्यावर दबाव कुणाचाच नाही. आम्ही अजित दादांच्या विचारांचे आहोत. अजित दादांनी सुद्धा तसंच केलं असतं. पूर्ण माहिती घेऊन पत्रकार परिषद घेतली असती, असं यावेळी त्यांनी सांगितलं. तर पत्रकारांशी बोलल्यानंतर परत जायला निघालेल्या जय पवारांनी लिफ्टचा प्रवास टाळून पायी १८ माळे जिने उतरण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed