Jay Pawar meets Pinky Mali family : लिफ्ट येत नसल्याने आणि अगोदरच जय पवार यांना वर येताना लिफ्ट व्हायब्रेट करत असल्याचे जाणवल्याने त्यांनी सहकाऱ्यांसोबत 18 मजले खाली पायी उतरण्याचा निर्णय घेतला.
पिंकी माळींच्या कुटुंबाची भेट
कालपर्यंत पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्याकरिता अजित दादांच्या परिवारातून कुणीही गेलेले नव्हतं. अशातच काल जय पवार हे पिंकी माळी यांच्या प्रभादेवी येथील राहत्या घरी सांत्वनपर भेटीला दाखल झाले. साधारणतः ते 5 वाजताच्या दरम्यान शिवकुमार माळी यांच्या इमारतीखाली पोहोचले. यावेळी बरेच सहकारी त्यांच्या सोबत होते. माध्यमांचे प्रतिनिधी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शिवकुमार माळी यांचे घर प्रभादेवी येथील इमारतीत 18 व्या मजल्यावर आहे. लिफ्टच्या आत 18 व्या मजल्यावर जाताना जय पवार यांना लिफ्ट व्हायब्रेट करीत असल्याचे जाणवले. शेवटी जय पवार शिवकुमार माळी यांच्या घरी सुखरूप पोहोचले.
Nashik Crime : नाशिकच्या तरुणाची बॉडी सापडली, 15 दिवस मारेकऱ्याच्या शोधासाठी मोर्चे, आरोपी निघाले बायको आणि प्रियकर
जय पवार जिन्याने उतरले
सांत्वनपर भेट झाल्यानंतर जय पवार माध्यमांना प्रतिक्रिया देत लिफ्टकडे जायला निघाले. यावेळेस पिंकी माळी यांचे भाऊ जय पवार यांच्यासोबत होते. पिंकी माळी यांच्या भावाने जय पवार यांना लिफ्टने खाली जाण्याचा आग्रह केलेला दिसला. काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर वर लिफ्ट येत नसल्याने आणि अगोदरच जय पवार यांना वर येताना लिफ्ट व्हायब्रेट करत असल्याचे जाणवल्याने जय पवार यांनी सहकाऱ्यांसोबत 18 मजले खाली पायी उतरण्याचा निर्णय घेतला.
Sudhir Mungantiwar : राज्यपालांना विधेयकाची प्रत इंग्रजीत का हवी? मुनगंटीवारांचा सवाल, नार्वेकरांनी फेटाळलं, विधिमंडळातच खडाजंगी
खाली जातांना लिफ्टमध्ये काही बिघाड झाल्यास कदाचित आपण लिफ्टमध्ये अडकू अशी शंका त्यांच्या मनात असावी. मात्र अजित दादा विमान दुर्घटनेनंतर पवार कुटुंबीय स्वतःची काळजी घेताना दिसून आले. अशाप्रकारे जय पवार पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाले. जय पवार यांच्या या कृतीची मात्र माध्यमांमध्ये चर्चा झालेली दिसून आली.
Jay Pawar पिंकी माळींच्या कुटुंबियांच्या भेटीला, ‘पुढच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेणार’
