Shaniwarwada to Sarasbaug Tunnel: पुण्यातील मध्यवर्ती भागातील कोंडी फोडण्यासाठी शनिवारवाडा ते सारसबाग भुयारी मार्ग उभारण्याची शक्यता आहे. या मार्गाच्या शक्येतेची पडताळणी करून अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती दिली.
६०० कोटींचा निर्णय लवकरच
‘पीएमआरडीए’च्या रिंग रोडसाठी भूसंपादनासाठी लागणाऱ्या ६०० कोटी रुपयांबाबत सरकार सकारात्मक असून, लवकरच यावर निर्णय घेतला जाईल, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले. आमदार महेश लांडगे यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत आमदार हेमंत रासने, राहुल कूल, शंकर जगताप आणि राजेश पवार यांनी सहभाग घेतला.
‘दररोज सव्वा कोटींचा दंड भरा!’ Pune Ring Roadच्या कंत्राटदाराला ताकीद; कामांचा वेग वाढवण्याचे MSRDCकडून कठोर आदेश
पुण्यातील मध्यवर्ती भागातील शिवाजीनगर आणि बाजीराव रस्त्यावरील कोंडी फोडण्यासाठी शनिवारवाडा ते सारसबागदरम्यान भुयारी मार्ग करण्याची मागणी आमदार हेमंत रासने यांनी केली होती. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल मिळाल्यावरच याबाबत तांत्रिक निर्णय घेऊ. शहरातील अवैध फ्लेक्स आणि त्यासाठी उभारल्या जाणाऱ्या लोखंडी सांगाड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवरही कारवाई होईल.’
कॅनॉलच्या पाण्यासाठी…
आमदार राहुल कुल यांनी पुणे शहराच्या आजूबाजूला असलेल्या ‘रिंग रोड’ची कामे कधी सुरू होणार? खडकवासला ते लोणीकाळभोर यादरम्यान बोगदा करण्यात येणार असून, त्याद्वारे कॅनॉलचे पाणी नेण्यासाठी २,२०० कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे ३४ किलोमीटरचा लांबीची जागा रहदारीसाठी उपलब्ध होऊ शकते, अशी मागणी केली. त्यावर मिसाळ म्हणाल्या, ‘एमएसआरडीसी’ करीत असलेल्या रिंग रोडच्या १२ पैकी नऊ ‘पॅकेज’ची कामे सुरू केली आहेत. ‘पीएमआरडीए’च्या रिंग रोडसाठी १४.१ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाची गरज असून, त्यासाठी ६०० कोटी रुपयांची गरज आहे. मुख्यमंत्र्यांकडून या भूसंपादनासाठी लागणारी रक्कम राज्य सरकार आणि ‘पीएमआरडीए’ उपलब्ध करून देईल, असे स्पष्ट केले असल्याचे मिसाळ म्हणाले.
Western Railway: ‘मिनी मॉल’, ‘कॅफे’सारख्या सुविधा रेल्वे स्थानकावरच! पश्चिम रेल्वेचं महसूल दुप्पट करण्याचं उद्दिष्ट; कसा होईल फायदा?
नऱ्हे ते रावेत पूल
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी चर्चेला उत्तर देताना सांगितले, की पुणे-बेंगळुरू महामार्गावरील कोंडी सोडवण्यासाठी नऱ्हे ते रावेत या पुलाचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्यासाठी ३,६६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. स्वामी नारायण मंदिर, भूमकर चौक आणि नवले पूल या ठिकाणची कामे युद्ध पातळीवर सुरू असून अतिरिक्त सेवा रस्तेही तयार केले जात आहेत.
