रशिया आणि युक्रेन या देशांतून स्थानिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात सूर्यफूल तेलाची आयात होते. इस्रायल, अमेरिका- इराण युद्धामुळे इतर देशांतील पुरवठा साखळीवरही ताण निर्माण झाल्याचे व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. परिणामी सोयाबीन, सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आठवडाभरात खाद्यतेलाच्या प्रतिकिलो दरामध्ये साधारण १५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय सूर्यफूल तेलाचा १३ किलोचा आणि सोयाबीन तेलाचा १५ किलोचा डबा तब्बल दीडशे रुपयांनी, तर शेंगदाणा तेलाचा १५ किलोचा डबा साडेतीनशे रुपयांनी महागला आहे.
Rajabhau Waje: शेतकऱ्यांच्या घामाला आता कायदेशीर किंमत; खासदार राजाभाऊ वाजेंनी मांडले खासगी विधेयक
स्थानिक बाजारपेठेत इराणमधून मांबरा बदाम, पिस्ता, केसर आणि अंजिरची आयात होते, तर अमेरिकेतून साध्या बदामाची आवक होते. अफगाणिस्तानमधून काळ्या मनुक्यांची आयात केली जाते. मात्र, ही आयात विस्कळीत झाल्याने सुकामेव्याच्या दरात मोठी उसळी आली आहे. काही प्रकारच्या सुकामेव्याच्या दरात तब्बल पाचशे रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
शेंगदाणा आवाक्याबाहेर
घाऊक बाजारात शेंगदाणा प्रतिकिलो १७५ ते १८० रुपयांनी विक्री होत आहे. कच्च्या मालाच्या दरवाढीचा परिणाम शेंगदाणा तेलावरही झाला असून, शेंगदाणा तेलाचा १५ किलोचा डबा साडेतीनशे रुपयांनी महागला आहे.
अमेरिका-इराण युद्ध आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघर्षामुळे खाद्यतेल, सुकामेव्याची आयात विस्कळीत झाली आहे. त्यामुळे आठवडाभरात दरांतही तेजी आली आहे. पुढील दहा दिवस दर चढेच असण्याची शक्यता आहे. -प्रवीण संचेती, व्यावसायिक
Nashik Crime : नाशिकच्या तरुणाची बॉडी सापडली, 15 दिवस मारेकऱ्याच्या शोधासाठी मोर्चे, आरोपी निघाले बायको आणि प्रियकर
खाद्यतेलांचे दर
तेल -जुने दर -नवे दर
सूर्यफूल –२,३७५ –२,५३५ (१३ किलो)
सोयाबीन –२,२७० –२,४३० (१५ किलो)
शेंगदाणा –२,७०० –३,०३० (१५ किलो)
सुकामेव्याचे दर असे (प्रतिकिलो)
सुकामेवा -जुने दर -नवे दर
मांबरा बदाम –३,४०० ते ३,५०० –४,०००
पिस्ता –२,२०० –२,४००
अंजीर –१,६०० –२,०००
केसर –२३० ते २४० –३०० (प्रति ग्रॅम)
