Nashik News: पावणेदोन कोटींच्या ट्रॅश स्किमरच्या देखभाल व दुरुस्तीवर पाच वर्षांत सव्वादोन कोटी खर्च केले जाणार असल्याने ‘नाकापेक्षा मोती जड’ अशी या मशिनची अवस्था झाली आहे.
हा प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आल्यानंतर गुरुवारी (दि. १२) महासभेने त्याला मंजुरी दिली. पावणेदोन कोटींच्या ट्रॅश स्किमरच्या देखभाल व दुरुस्तीवर पाच वर्षांत सव्वादोन कोटी खर्च केले जाणार असल्याने ‘नाकापेक्षा मोती जड’ अशी या मशिनची अवस्था झाली आहे. गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणासंदर्भात पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सध्या उच्च न्यायालयाने गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी विशेष उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासह तिच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात आहेत. गोदावरी नदीसह उपनद्यांमध्ये शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासह गोदावरीतील पाणवेली काढणे आणि स्वच्छता करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधींची उधळपट्टी केली जाते. गोदावरीसह नंदिनी, वालदेवी आणि वाघाडी या उपनद्यांच्या स्वच्छतेसाठी दरवर्षी दीड कोटींचे ठेके काढले जात होते.
Sharad Pawar: पंतप्रधानांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण; स्वागताध्यक्ष शरद पवार यांचे नरेंद्र मोदींना पत्र
या उधळपट्टीनंतरही पाणवेली जैसे थे राहत असल्याने महापालिकेने स्मार्ट सिटीच्या निधीतून रोबोटिक ट्रॅश स्किमरद्वारे गोदावरीची स्वच्छता करण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी केली होती. स्मार्ट सिटीच्या निधीतून तब्बल एक कोटी ७५ लाख रुपये खर्चुन हे रोबोटिक मशिन खरेदी केले होते. मात्र, हे मशिन हाताळणीचे तंत्र व देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेकडे यंत्रणा नसल्याचे कारण देत पाच वर्षांपूर्वी क्लिनटेक प्रा. लि. या दिल्लीच्या कंपनीकडे या यंत्राची जबाबदारी देण्यात आली होती. ठेक्याची मुदत संपुष्टात आल्याने पुन्हा पाच वर्षांसाठी ट्रॅश स्किमरच्या दुरुस्तीसाठी निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘एक निवडणूक’वर मोहोर; एकत्र निवडणुका घेण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नाशिक महापालिकेला ‘पांढरे हत्ती’च का हवेत हे कळत नाही. वेस्ट टू एनर्जी, खतप्रकल्प, सामाजिक सभागृह अशा अनेक प्रकल्पांच्या नावाखाली किती तरी ‘पांढऱ्या हत्ती’ वर महापालिकेची उधळपट्टी सुरूच आहे. आता आणखी पांढरा हत्ती येऊ घातला आहे. तो म्हणजे गोदापात्रातील गाळ काढण्यासाठी महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीने खरेदी केलेले ट्रॅश स्किमर, पावणेदोन कोटींच्या या यंत्रावर पाच वर्षांत सव्वादोन कोटी खर्च होणार आहेत. गाळ, पाणवेली काढण्यावर कुणाचंही दुमत नाही. मात्र, यंत्र खरेदी करून खर्च वाचण्याऐवजी तो वाढतच असेल तर काय उपयोग? एकीकडे नाशिककरांच्या सुविधांवर, कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवर आखडता हात घ्यायचा आणि दुसरीकडे ठेकेदारांवर पैसा वाया घालवायचा हे अयोग्य आहे. महापालिकेने स्वतःची यंत्रणा वापरण्यावर गांभीर्याने विचार करावा.
भाजपचे संभाव्य मंत्री ठरले! अमित शहा यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
पाचऐवजी आठ महिने मशिन चालणार
महापालिकेने दिल्लीतील कंपनीकडे पाच वर्षांसाठी या ट्रॅश स्किमरची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी दिली होती. पाणवेली, प्लास्टिक, नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम या मशिनद्वारे होणार आहे. त्यामुळे या मशिनमुळे महापालिकेचा आर्थिक खर्चही वाचणार असल्याचा दावा पर्यावरण विभागाने केला आहे. पहिल्या करारनाम्यात कंपनीकडून वर्षाला पाच महिने मशिन कार्यान्वित ठेवली जाणार होती. मात्र, नवीन निविदेत आता हे मशिन पाच महिन्यांऐवजी आठ महिने वापरात आणले जाणार असून, त्याची जबाबदारी ठेकेदार कंपनीची राहणार आहे