Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या २०२२ मधील सत्तास्थापनेबाबत भाष्य केलं आहे. शिंदेंसोबत सरकार स्थापन केल्यानंतर मिळालेल्या उपमुख्यमंत्रिपदावर त्यांनी मोठं विधान केलं आहे.
२०२२ मध्ये एकनाथ शिंदे आमि त्यांच्या आमदारांच्या पाठिंब्यावर जे सरकार स्थापन झालं होतं, त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्यात आलं, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. त्याच उपमुख्यमंत्रिपदावर आता फडणवसींना खुलासा केला आहे.
शरद पवारांनी तलवारीने केक कापला अन् वादाला सुरूवात झाली; शुभेच्छा देण्यासाठी अजितदादांसोबत पाहा कोण आले
एका वृत्तवाहिनाशी बोलताना फडणवीसांनी सांगितलं, की ज्यावेळी आम्ही शिवसेनेसह मिळून सरकार स्थापन केलं त्यावेळी आमचा पक्ष सर्वात मोठा आहे आणि आमच्या पक्षाचा नेता सरकारमध्ये नसेल तर सरकार किंवा पक्ष दोन्ही नीट चालणार नाही असं म्हटलं होतं. मला उपमुख्यमंत्री बनवण्याचं सांगण्यात आलं. मी माझ्या पक्षाचा निर्णय मान्य केला आणि उपमुख्यमंत्री बनलो. आज मी त्या गोष्टीचा विचार करतो, तर तो निर्णय मला अतिशय योग्य वाटतो, असं फडणवीस म्हणाले.
पहिल्या नोकरीचा पहिलाच दिवस, पण तिच्या आयुष्याचा अखेरचा दिवस ठरला; कुर्ला बस अपघातातील हृदयद्रावक घटना
इतकी प्रसिद्धी मिळाली नसती…
या उपमुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, उपमुख्यमंत्री बनल्यानंतर जे नाव आणि प्रसिद्धी मला मिळाली, ती प्रसिद्धी मला मुख्यमंत्री बनून मिळाली नसती. उपमुख्यमंत्री म्हणून सरकार चालवल्यानंतर माझं खूप कौतुक झालं. अडीच वर्षे त्या सरकारमध्ये राहून मी मोठे बदल घडवून आणू शकलो.
CM देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; २०२२ मध्ये मी मुख्यमंत्री झालो असतो, तर कदाचित…
मी बाहेरुन काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण…
त्यावेळची परिस्थिती सांगताना फडणवीस म्हणाले, की एकनाथ शिंदेंसोबत राहून ज्यावेळी सरकार स्थापन करत होतो, त्यावेळी मी बाहेरुन काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. कारण मी आधी मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे. पण पंतप्रधान मोदी आणि माझ्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मी उपमुख्यमंत्री बनून कंट्रोल करू शकतो असा सल्ला दिला आणि त्यामुळेच मी पक्षाचा निर्णय मान्य केला. तो निर्णय योग्य होता, असं ते म्हणाले.