• Thu. Dec 26th, 2024
    बस चालक मोरे तुरुंगात, पण…; प्रकरणात नवी माहिती समोर, कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय?

    Kurla Bus Crash: कुर्ला बेस्ट बस अपघातात ७ जणांनी जीव गमावला. या अपघातात ४८ जण जखमी झाले. सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास हा अपघात झाला. त्यानंतर आसपासच्या लोकांनी बसचा चालक संजय मोरेला चोप दिला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: कुर्ला बेस्ट बस अपघातात ७ जणांनी जीव गमावला. या अपघातात ४८ जण जखमी झाले. सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास हा अपघात झाला. त्यानंतर आसपासच्या लोकांनी बसचा चालक संजय मोरेला चोप दिला. संजय मोरे सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याची चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा झाला आहे.

    संजय मोरेला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. त्यानं मोठी बस चालवलेली नव्हती. पण अवघ्या तीन दिवसांच्या प्रशिक्षणानंतर त्याच्या हाती मोठी इलेक्ट्रिक बस देण्यात आली. मोरे १ डिसेंबरपासून कंत्राटी चालक म्हणून बेस्टमध्ये रुजू झाला होता. अपुरं प्रशिक्षण देण्यात आल्यानं बसचा अपघात झाल्याचं चौकशीतून समोर आलेलं आहे.
    Kurla Bus Accident: तीन नव्हे, फक्त एकच दिवस…; चौकशीत मोरेचा धक्कादायक दावा; नेमकं काय घडलं ते सांगण्यास नकार
    बेस्ट प्रशासनानं ईव्हे ट्रान्स कंपनीला कंत्राट दिलेलं आहे. या कंपनीनं सोमवारी (ज्या दिवशी अपघात झाला) मोरेला इलेक्ट्रिक बसच्या तीन फेऱ्या पूर्ण करण्यास सांगितलं होतं. मोरे दुपारी अडीचच्या सुमारास कामावर आला होता. रात्री तो ३३२ क्रमांकाची बस घेऊन निघाला. ही बस कुर्ला रेल्वे स्थानक पश्चिमेहून आगरकर चौकाकडे जाण्यास निघाली होती. मोरेनं बस सुरु करताच पुढील काही मिनिटांतच अपघात झाला. अनियंत्रित झालेल्या बसनं ३० ते ४० वाहनांना धडक दिली.

    पोलिसांनी अपघात प्रकरणी संजय मोरेला अटक केली आहे. तो २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत असेल. पण धक्कादायब बाब म्हणजे पोलिसांनी ईव्हे ट्रान्स कंपनीविरोधात एफआयआर दाखल केलेला नाही. फ्री प्रेस जर्नलनं याबद्दलचं वृत्त दिलेलं आहे. अननुभवी व्यक्तीच्या हाती बस देऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याचा गुन्हा कंपनीकडून घडलेला आहे. पण तरीही कंपनीविरोधात अद्याप एफआयआरदेखील झालेला नाही. त्यामुळे पोलीस नेमकं कोणाला वाचवत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
    Kurla Bus Accident: भेदरलेले प्रवासी, वेग वाढताच जीव मुठीत, काचा फुटताच उड्या, ‘त्या’ बसमधलं CCTV फुटेज समोर
    आम्ही आरटीओच्या अहवालाची प्रतीक्षा करत आहोत. अपघात झालेल्या बसमध्ये काही बिघाड होता का, याची माहिती आरटीओच्या अहवालातून मिळेल. मग या प्रकरणी पुढील कार्यवाही केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे. कंत्राटी चालक पूर्णत: प्रशिक्षित आहेत का, याची खातरजमा करण्याची जबाबदारी बेस्ट प्रशासनाची असते. पण ही खातरजमा करण्यात बेस्ट प्रशासनाकडून झालेली नव्हती.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed