Pune PMPML Bus: लक्ष्मी रस्त्यावरून धावणाऱ्या पीएमपी बसच्या मार्गात सकाळी दहा ते सायंकाळी पाच दरम्यान बदल करण्यात आला आहे.
महापालिकेकडून पादचारी दिनाच्या दिवशी लक्ष्मी रस्त्यावर वॉकिंग प्लाझाचे आयोजन केले जाते. हा रस्ता ‘नो व्हेइकल झोन’ केला झाते. या उपक्रमासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. त्यामुळे बुधवारी लक्ष्मी रस्त्यावरून नियमितपणे धावणाऱ्या बसच्या मार्गात बदल केला जाणार आहे.
असा असेल बस मार्गात बदल
बसमार्ग क्रमांक ५५, ५८, ५९ हे बस मार्ग शनिपारकडे येताना कुमठेकर रस्ता मार्गे नियमित मार्गाने व शनिपारकडून जाताना अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, टिळक चौकातून पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील.
बसमार्ग क्रमांक ५७ या मार्गावरील बस पुणे स्टेशनकडून जाताना केळकर रस्ता, नारायण पेठ मार्गे टिळक चौक व पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील.
Kirit Somaiya: मालेगावातील पैसा ‘व्होट जिहाद’साठीच; पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांचा आरोप
अटल पुण्यदशमचे बसमार्ग क्रमांक सात व नऊ तसेच बसमार्ग क्रमांक ८१, १४४, १४४अ, १४४क व २८३ या मार्गावरील बसेस पुणे स्टेशनकडे जाताना नियमित मार्गाने संचलनात राहतील. तसेच पुणे स्टेशनकडून येताना केळकर रस्ता मार्गाने नारायण पेठ टिळक चौक व पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील.
बसमार्ग क्रमांक १७४ या मार्गावरील बस पुणे स्टेशनकडून एनडीएकडे जाताना सिटी पोस्टपर्यंत नियमित मार्गाने व पुढे उजवीकडे वळून अप्पा बळवंत चौकच्या पुढे केळकर रस्ता मार्गाने नारायण पेठ टिळक चौक व पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील. याशिवाय एनडीएकडून पुणे स्टेशनकडे येताना या मार्गावरील बस नियमित मार्गाने संचलनात राहतील.
‘मविआ’मध्ये फूट? नार्वेकरांवर ‘उबाठा’चा पक्षपातीपणाचा आरोप; काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कौतुक
बसमार्ग क्रमांक १९७ व २०२ या मार्गावरील बस हडपसरकडून कोथरूड डेपो/वारजे माळवाडीकडे जाताना सिटी पोस्टपर्यंत नियमित मार्गाने व पुढे उजवीकडे वळून अप्पा बळवंत चौकच्या पुढे केळकर रस्ता मार्गाने नारायण पेठ मार्गे टिळक चौक व पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील; तसेच कोथरूड डेपो/वारजे माळवाडी कडून हडपसरकडे येताना सदर मार्गावरील बस नियमित मार्गाने संचलनात राहतील.
बसमार्ग क्रमांक ६८ या मार्गावरील बस अप्पर डेपोकडे जाताना नियमित मार्गाने व अप्पर डेपोकडून सुतारदऱ्याकडे येताना टिळक रस्ता मार्गे संचलनात राहतील.