• Sat. Dec 28th, 2024
    Kurla Best Bus Accident: कुर्ल्यात दहशतवादी हल्ल्यासारखं दृष्य, महिला बस आणि कारमध्ये अडकलेली, बेस्ट बस अपघाताचा थरार

    Kurla Bus Accident News: कुर्ल्यात बेस्ट बसने धडक दिल्याने पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर ३०-३५ जण जखमी झाले आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: मुंबईत कुर्ला येथील बेस्ट अपघातात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यऊ झाला आहे तर ३० ते ३५ जण जखमी असल्याची माहिती आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास या ही बस काळ बनून आली आणि समोर येईल त्याला चिरडत निघाली. यावेळी या भरधाव बसने अनेकांना धडक दिली तसेच अनेक वाहनांनाही धडक दिली. कुर्ला एलबीएस मार्गावरील मार्केटमध्ये रात्री रहदारी असताना ही बस अचानक भरधाव वेगात आली आणि तिने अनेकांना चिरडलं. ही धडक इतकी जबरदस्त होती की वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. तर, या बसने जवळपास ४० लोकांना चिरडलं. ज्यापैकी पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

    इतकंच नाही तर रात्री घरी जाण्याची वेळ असल्याने बसमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी होती. जेव्हा अपघात घडला तेव्हा बसमध्ये ६० प्रवासी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी याप्रकरणी बस चालक संजय मोरे याला अटक केली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे ज्यामध्ये ही बस अनेकांना चिरडताना दिसत आहे.

    या भीषण अपघातात विजय विष्णू गायकवाड, आफ्रीन अब्दुल सलीम शहा (१९), अनम शेख (२०), फातिमा गुलाम कादरी (५५), शिवम कश्यप (१८) यांचा मृत्यू झाला आहे.

    एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, या बसने ७ ते ८ गाड्यांना धडक दिली. यामध्ये दोन-तीन रिक्षा, टेम्पो आणि कारचा समावेश होता. गाड्यांना उडवत बस मार्केटमध्ये घुसली. अपघात झाला तेव्हा एक महिला बस आणि एका गाडीच्या मध्ये अडकली होती आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.

    प्रत्यक्षदर्शी कपिल सिंग यांनी सांगितले की, कुर्ला ते अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान धावणारी मार्ग क्रमांक ३३२ ची बेस्ट बस पूर्णपणे भरली होती. बसने प्रथम ऑटोरिक्षाला धडक दिली आणि नंतर एकामागून एक वाहनांना धडक दिली आणि आंबेडकर कॉलनी गेटवर धडकल्यानंतर ही बस थांबली. या घटनेत बसने अनेक पादचारी आणि फेरीवाल्यांना धडक दिली. नेमकं काय घडतंय हे कळण्याच्या आता हे सारं घडलं. लोकांना धक्का बसला होता. ते एखाद्या दहशतवादी हल्ल्यासारखं दिसत होतं. संतप्त जमावाने बसचा पाठलाग करून चालकाला पकडले आणि पोलिस येईपर्यंत त्याला बेदम मारहाण केली.

    कुर्ला येथील रहिवासी साक्षीदार जैद अहमद यांनी सांगितलं की, ‘मी जेव्हा माझ्या घरातून रेल्वे स्टेशनवर जात होतो तेव्हा मला मोठा आवाज आला आणि बेस्ट बस चालकाने अनेक पादचाऱ्यांना, रिक्षा आणि कारला धडक दिल्याचे मला दिसले.’ अहमदने सांगितले की, रिक्षात अडकलेल्या काही जखमींना त्यानी वाचवले. आम्ही त्याला दुसऱ्या रिक्षात भाभा रुग्णालयात पाठवले. शारिक अन्सारी यांनी सांगितले की बस थांबण्यापूर्वी त्यांची कार १०० मीटरपर्यंत फरफटत नेण्यात आली.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed