Ramdas Athwale: मुख्यमंत्री झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्याबाबतची भूमिका मांडली. त्यावर आता केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरेंची हवा विधानसभा निवडणुकीत गेली आहे. राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदा १४३ जागांवर लढली. माझ्याशिवाय सरकारच येणार नाही अशा स्वप्नात ते राहिले. पण त्यांचा स्वप्नभंग झाला. राज ठाकरेंच्या सभा मोठ्या होतात. पण लोक ऐकायला येतात आणि निघून जातात. ते काय मतं देण्यासाठी त्यांच्यासोबत राहत नाहीत. ते महायुतीत येतील असं वाटत नाही. त्यांना महायुतीत घेऊन फायदा नाही. मी महायुतीत असताना राज ठाकरेंची गरज काय?, असा प्रश्न विचारत आठवलेंनी राज यांना टोला लगावला.
महायुतीचा शपथविधी दणक्यात, अनेकजण पोलिसात; १३ एफआयआर, १२.४ लाखांचं प्रकरण नेमकं काय?
महायुतीला महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांचा फायदा होऊ शकतो. पण याबद्दलचा निर्णय घ्यायचा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना घ्यायचा आहे. पण राज ठाकरेंना घेण्याची गरज नाही आणि त्यांना घेतल्यानं आपलं नुकसानच होणार आहे, अशा शब्दांत आठवलेंनी राज यांना लक्ष्य केलं. राज ठाकरेंना महायुतीत घेऊन फायदा नाही. मी असताना महायुतीला राज यांची गरज नाही. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची हवा गेलेली आहे. माझ्याशिवाय सत्ता येणार नाही, असं त्यांना वाटत आहे. मात्र त्यांचा स्वप्नभंग झाला, अशी कोपरखळी आठवलेंनी मारली.
महायुतीत खातेवाटपावरुन रस्सीखेच सुरु असताना आठवलेंनी काहीशी हताश प्रतिक्रिया दिली. मंत्रिपदच मिळतंय की माहीत नसल्यानं खात्याचा विषय नाही, असं आठवले म्हणाले. विधानसभा निवडणुकीत आम्हाला १०-१२ जागा द्या असं आम्ही म्हणत होतो. १०-१२ जागा मिळणं अशक्य असल्याचं वाटलं तेव्हा मी ४-५ जागाच मागितल्या होत्या, याची आठवण आठवलेंनी करुन दिली.
भाजप पुन्हा एकदा ‘शिंदे पॅटर्न’ राबवण्याच्या तयारीत; CMची खुर्ची धोक्यात, मित्रपक्ष भडकला
आम्ही काय आता महायुतीला सोडणार नाही. महादेव जानकर आमचे मित्रच आहेत. ते पवार साहेबांना भेटून आले आणि लगेच मग त्यांना महायुतीत परभणीची जागा सोडली. मी पवार साहेबांना भेटलो असतो, तर मलाही शिर्डीची जागा मिळाली असती. पण मी काय त्यांना भेटून आलो नाही, असं आठवले म्हणाले.