Raigad Mangaon News : रेवाळजेजवळ कुंडलिका नदीत चार जण बुडाले असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तिघांचे मृतदेह शोधण्यास बचाव पथकाला यश आलं आहे, तर एकाचा शोध अद्याप सुरू आहे.
पाण्याचा अंदाज चुकला आणि अनर्थ घडला
कुंडलिका नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रायगडमधील माणगाव तालुक्यातील रेवाळमध्ये घडली. बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या तीनही महिलांचा मृत्यू झाला. आतापर्यंत यापैकी तिघांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यास बचाव पथकाला यश आलं आहे. सिद्येश राजेंद्र सोनार (२१), सिद्धी गोपीचंद पेडणेकर (१६), काजल सोनार (२६) आणि सोनी सोनार (२७) अशी मृतांची नावं आहेत. मृत सर्वजण नवी मुंबईतील रहिवासी असून शिरवली येथे आजीच्या गावी आले असता हा दुर्दैवी प्रसंग घडला. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पवना धरणात गेले, पाण्यात उतरले, अंदाज चुकला आणि होत्याचं नव्हतं झालं; पुण्यातील हृदयद्रावक घटना
माणगाव तालुक्यातील रेवाळजे जवळ कुंडलिका नदीत ही धक्कादायक घटना घडली आहे. सिद्देश राजेंद्र सोनार (२१) आणि सिद्धी गोपीचंद पेडणेकर (१६) आणि आणखी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.
Crime News : घाबरलेल्या मुलांचा शाळेत जाण्यास नकार, पालकांनी शाळेत धाव घेताच संतापजनक प्रकार उघड, प्रकरण काय?
आजीच्या गावी आले, नदीवर गेले; एक बुडाला म्हणून तिघी धावल्या, नवी मुंबईतील चौघांसोबत आक्रीत घडलं
एकाला वाचवण्यासाठी तिघी नदी उतरल्या आणि…
हे सर्वजण आज सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास नदीवर पोहण्यासाठी गेले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. यापैकी सिद्देश सोनार हा मुलगा पाण्यात पडला. त्यानंतर या तीन तरुणी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरल्या. पण नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने या चौघांचाही बुडून मृत्यू झाला. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात मिळालेले दोन मृतदेह शव विच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे. तर काजल सोनार (२६) आणि सोनी सोनार (२७) यांचे मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे.