Eknath Shinde Gets Death Threat: एकनाथ शिंदे यांना धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका २४ वर्षीय तरुणाने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ टाकल्याची माहिती आहे.
पोलिसांकडून धमकी देणाऱ्या तरुणाचा शोध सुरु
याप्रकरणी ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या तरुणाचा शोध घेत आहेत. तरुणावर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर जमले होते.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, एका २४ वर्षीय तरुणाने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट टाकली आहे. यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.
या तरुणाला अटक करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
हितेश प्रभाकर धेंडे हा ठाण्यातील श्रीनगर वारली पाडा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारी पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर टाकली. या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
याबाबत शिवसेनेच्या ठाण्यातील एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, “धेंडे याने एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. असभ्य पोस्ट टाकली. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे.”
हितेश धेंडेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसैनिकांनी श्रीनगर पोलीस स्टेशनबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केली. त्याच्याविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या तरुणाचा शोध घेत आहेत