Produced byविश्रांती शिंदे | Contributed byमोबिन खान | महाराष्ट्र टाइम्स.कॉम5 Jan 2025, 9:46 pm
शिर्डीतील साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करावं आणि हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी…शिक्षणासाठी खर्च करावे, अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटलांनी केली आहे. प्रसंगी यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, असा इशाराही दिलाय.शिर्डी संस्थान भक्तांच्या देणगीतून दररोज पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांना मोफत भोजन देतात.मात्र यामुळे शिर्डीत भिकार्यांची संख्या वाढली असून मोफत जेवण बंद करावं….अशी अपेक्षा ही माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलीय. यावर साईभक्तांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत, ऐकुयात…