Eknath Shinde Press Conference: राज्याचे नवे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद यावेळीही महायुती सरकार गतिमानपणे काम करणार असल्याचे आश्वासन जनतेला दिले आहे. तर देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्यामागील गोष्टही शिंदेंनी सांगितली आहे.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले, मागील अडीच वर्षातील सरकार हे बाळासाहेबांच्या विचाराचं आणि न्याय देणारं सरकार ठरलं. मोदी आणि अमित शहा आमच्या सरकारच्या पाठीशी उभे राहिले, त्यामुळेच अडीच वर्षांचा काळ यशस्वी झाला. राज्यात आम्ही अनेक कल्याणकारी योजना राबवल्या, त्याचीच पोचपावती आम्हाला मिळाली. मी लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी आणि लाडके ज्येष्ठ असे सर्वांचे आभार मानतो. आताही महायुतीच्या ऐतिहासिक अशा शपथविधीनंतर राज्याला विकासाकडे नेणारं सरकार स्थापन झालं आहे.
नव्या सरकारच्या शपथविधीनंतर मोठी अपडेट! विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाची तारीख ठरली
यासोबतच एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, ‘अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझं नाव मुख्यमंत्री म्हणून सुचवलं होतं. आत्ता यावेळी मी त्यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून सुचवलं आहे.
महायुतीला यावेळी भूतो न भविष्यती असं बहुमत मिळालं आहे. आम्ही ४० चे ६० आमदार झालो ही आमच्या कामाची पोचपावती आहे. सत्ता आमच्यासाठी जनसेवेचं साधन आहे. डीसीएम म्हणजे ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ अशाप्रकारेच आम्ही टीम म्हणून काम करणार आहोत. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना यांना माझं पूर्ण सहकार्य असणार आहे.