ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शरद पवारांसह २६ उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत. पवारांच्या उमेदवारी अर्जावर आमदार अभिजीत पाटील यांनी सूचक म्हणून सही केली होती. या आमदारकीचे हे फलित असल्याच्या भावना अभिजीत पाटील यांनी व्यक्त केल्या. शरद पवारांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग देशाला होईल, असे मत अभिजीत पाटलांनी व्यक्त केले.