Jalna Crime News : जालना जिल्ह्यात एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. एका 40 वर्षीय व्यक्तीने स्वत:चं आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पत्नीपासून विभक्त
मृत व्यक्तीचं नाव राजेश प्रकाश चव्हाण (वय 40) असं असून ते कन्हैयानगर परिसरात राहत होते. ते विवाहित असून काही दिवसांपासून ते पत्नीपासून वेगळे राहत असल्याची माहिती मिळाली आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी त्यांचे कुटुंबीय लग्नकार्याकरिता बाहेरगावी गेले होते. त्यादरम्यान घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत राजेश चव्हाण यांनी घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
Kolhapur Crime : क्रिकेटपासून ते गावच्या निवडणुकीपर्यंत खुन्नस, जुन्या वादातून पुन्हा फूट पडली; मित्रानेच जीवलग मित्राला भरचौकात संपवलं
नेमकं काय घडलं?
घरात कोणी नसल्यामुळे ही घटना तात्काळ कोणाच्या लक्षात आली नाही. मात्र, काल सोमवारी परिसरात दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांना संशय आला. याबाबत माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस कर्मचारी आणि पंचांच्या उपस्थितीत दरवाजा उघडून पाहणी करण्यात आली असता राजेश चव्हाण यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सुशील चव्हाण यांनी दिली. या घटनेमुळे कन्हैयानगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्येही खळबळ उडाली आहे.
Nashik Crime : डॉक्टर महिलेशी संबंध, डॉ. मनीषा जेजुरकरांचा मानसोपचार तज्ञ नवऱ्यानेच जीव घेतला, बहिणीचे गंभीर आरोप; पोस्टमार्टम रिपोर्टवर संशय
बाईक चालवताना हृदयविकाराचा झटका
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आनवा येथे काल शनिवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. दुचाकीवरून जात असताना 25 वर्षीय तरुणाला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
