Navi Mumbai Crime: या घटनेत जखमी झालेल्यांमध्ये अंजली नितीन खंदारे उर्फ अंजली उस्मान मोह शेख (३७), तिचा पती उस्मान शेख (४०) आणि नऊ महिन्यांचा त्यांचा मुलगा अफान या तिघांचा समावेश आहे.
हायलाइट्स:
बेलापूरमध्ये किरकोळ कारणावरून दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला
नऊ महिन्याच्या बळावर प्राणघातक हल्ला
पोलिसांनी हल्लेखोराला घेतलं ताब्यात
नवी मुंबई : लहान मुलाने रस्त्यावर शौच केल्याच्या किरकोळ कारणावरून एका व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या दाम्पत्यावर तसेच त्यांच्या नऊ महिन्याच्या बळावर लोखंडी सळई आणि कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी बेलापूर गावातील स्मशानभुमी लगतच्या पंचशिल नगर झोपडपट्टीत घडली. या हल्ल्यात नऊ महिन्याच्या बाळासह त्याचे आई वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नेरुळ मधील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर एन. आर. आय पोलिसांनी हल्लेखोर व्यक्ती राजु सट्टा याच्या विरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे.या घटनेत जखमी झालेल्यांमध्ये अंजली नितीन खंदारे उर्फ अंजली उस्मान मोह शेख (३७), तिचा पती उस्मान शेख (४०) आणि नऊ महिन्यांचा त्यांचा मुलगा अफान या तिघांचा समावेश आहे. सदरचे शेख दाम्पत्य आपल्या दोन मुलांसह बेलापूर गावातील स्मशानभुमी लगतच्या पंचशिल नगर झोपडपट्टीत राहण्यास आहेत. शेख दाम्पत्याचा दोन वर्षीय मुलगा अयान याने गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर शौच केले होते. यामुळे त्यांच्या शेजारी राहणारा आरोपी राजु सट्टा याला राग आल्याने त्याने शेजारी राहणाऱ्या शेख दाम्पत्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने लोखंडी सळई व कुऱ्हाड घेवुन शेख दाम्पत्याच्या घरात घुसून अंजलीवर सळईने हल्ला केला. त्यात ती जखमी झाल्यानंतर आरोपी राजु याने अंजलीच्या हातामध्ये असलेला तिचा नऊ महिन्याचा लहान मुलगा अफान याच्या डोक्यात सुद्धा कुऱ्हाडीने हल्ला केला. Ajit Pawar: लोकसभा निवडणुकीत फटका, सत्तेत येण्यासाठी ‘लाडकी बहीण’ योजना आणली, अजित पवारांची कबुली
त्यामुळे सदर मुलाच्या कपाळाला कुऱ्हाड लागुन तो सुद्धा गंभीर जखमी झाला. या प्रकारानंतर अंजली आपल्या मुलाला वाचविण्यासाठी त्याला घेवुन बाहेर पाळली असता, आरोपीत राजु हा कुऱ्हाड घेऊन तिच्या मागे धावून गेला. त्यामुळे अंजलीचा पती उस्मान याने त्याच्या मागे धावत जात राजुला बाजुला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी राजुने उस्मानला चावा घेऊन त्याच्या पायावर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात तिघेही जखमी झाल्यानंतर आरोपी राजु सट्टा याने पलायन केले. या घटनेत जखमी झालेल्या तिघांना नेरुळ मधील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर एन. आर. आय पोलिसांनी राजु सट्टा याच्या विरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा